संजीवनी अभियांत्रिकी : मेकॅट्राॅनिक्स व सिव्हिल-स्ट्रक्चरल शाखा, क्रांतिकारी पाऊल – अमित कोल्हे

कोपरगांव:

संजीवनी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला सन 2020- 21 या चालू वर्षापासून मेकॅट्राॅनिक्स व सिव्हिल-स्ट्रक्चरल इंजिनिअरींग या दोन अभियांत्रिकी शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागात राहूनही राज्यातील अभियांत्रिकी क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल टाकले असल्याची माहिती संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. तसेच एम.बी.ए. ची प्रवेश क्षमता ६० वरून १२०, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाला एमफार्मसी ड्रग्ज रेग्युलेटरी अफेर्स आणि फार्मास्युटीकल बायोटेक्नाॅलाॅजी हे दोन अभ्यासक्रम तसेच पी. एच.डी. सेंटरची मान्यता मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अमित कोल्हे म्हणाले पाॅलीटेक्निक मेकॅट्राॅनिक्स अभियांत्रिकी शाखेची क्षमताही आता ६० वरून १२० करण्यात आली आहे. सिव्हिल-स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही शाखा आय आय टी नंतर फक्त संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुरू करण्याची परवानगी मिळाली असुन बी. टेक., एम. टेक., आणि पी.एच.डी. पर्यंत शिक्षण देणारी आय आय टी नंतर संजीवनी ही एकमेव संस्था असणार आहे. बी. टेक. साठी प्रथम वर्ष प्रवेश क्षमता ६० असुन एम. टेक. ची प्रवेश क्षमता १८ आहे. स्थापत्य क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरींगचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य असते.

परदेशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या अभियांत्रिकी शाखेचे ज्ञान दिले जाते, परंतु भारतात या शाखेची पदवी प्राप्त करण्याची सुविधा पुरेशी नाही. सध्या उद्योग जगताची मागणी बदलली असुन काही इंडस्ट्रीज मेकॅनिकल, इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रिकल व काॅम्प्युटर इंजिनिअरींगचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देतात. एकाच अभियंत्याला इतर शाखांचे ज्ञान अभावानेच असते. सर्व शाखा समावेशक अभियंते निर्माण व्हावे म्हणुन अलिकडे मेकॅट्राॅनिक्स ही शाखा उदयाला आली असुन भविष्यातील रोजगाराच्या संधी विचारत घेवुन ग्रामीण महाराष्ट्रात एकमेव संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला ही शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

चार वर्षांच्या अभ्यासक्रमात ऊद्योग जगताशी निगडीत इंडस्ट्री ४. ० , रोबोटीक्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, अॅटोमेशन, सीएनसी अशा अभ्यासावर भर देण्यात येणार आहे. या शाखेची प्रवेश क्षमता ६० असुन पदवी पुर्ण केल्यावर बी. टेक. ही पदवी विध्यार्थ्यांना मिळणार आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त शिक्षण ण संस्थेचा दर्जा प्राप्त असल्यामुळे वरील दोनही नवीन अभियांत्रिकी शाखांना अभ्यासक्रम तयार करण्यासाठी माजी विध्यार्थी, शिक्षण तज्ञ, इंडस्ट्रीज मधिल इंजिनिअर्स, इत्यादी तज्ञांची समिती गठित करण्यात आली प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची रचना सुरू करण्यात आली आहे.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एम.बी.ए., संजीवनी फार्मसी महाविद्यालय व संजीवनी पाॅलीटेक्निक या सर्व संस्था एन.बी.ए. मानांकन प्राप्त असल्यामुळे नवीन अभ्यासक्रमांना मान्यता व प्रवेश क्षमता वाढ या सर्व बाबींना लागलीच परवानगी मिळाली, असे श्री कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.

फोटो अमित कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page