पोहेगावात हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मान्यता नितीन औताडे
In Pohegaon, Hindu Heart Emperor Hon. Nitin Autade recognized Balasaheb Thackeray College of Arts, Commerce and Science
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat4sep 2021, 16:30Pm.
कोपरगाव: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत , मा.खा सदाशिव लोखंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पोहेगाव येथे नव्याने सहकार महर्षी कै. गणपतराव रभाजी औताडे पाटील सामाजिक व शैक्षणिक मंडळ संचलित हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाकडून अंतिम मान्यता मिळालेली असून लवकरच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नितीन औताडे यांनी दिली आहे.
पोहेगाव मोठी बाजार पेठ असल्याने परिसरातील २० ते २५ गावांचा दैनंदिन संबंध येतो. आजूबाजूला असलेल्या २० ते २५ गावातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कोपरगाव किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. प्रवेशापासून तर प्रवासापर्यंत विद्यार्थ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते त्यामुळे पोहेगाव परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत होती. परिसरातील विद्यार्थ्यांना पोहेगांव येथे उच्च शिक्षण मिळण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून नितीनराव औताडे प्रयत्नशील होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ,खा सदाशिवराव लोखंडे यांच्या कडे अनेक वेळा परिसरातील शैक्षणिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा देत उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कागदपत्रांची पूर्तता केली.त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी पोहेगाव येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास अंतिम मान्यता दिली आहे. चालूूू शैक्षणिक वर्षामध्येे परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सांगत या नवीन महाविद्यालयामध्ये सर्व शैक्षणिक सुविधा अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध होणार असून विद्यार्थी प्रवेशासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन व केंद्रर शासनाच्या शिष्यवृत्यांचा पूर्ण लाभ मिळणार आहे. तरी परिसरातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन नितीन औताडे यांनी केले आहे.