जागतिक बँकेने कोपरगाव हद्दीतील नगर-मनमाड महामार्ग दुरूस्त करावा – सौ स्नेहलता कोल्हे
World Bank should repair Nagar-Manmad highway in Kopargaon limits – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun5sep 2021, 16:00Pm.
कोपरगाव: मागील अनेक दिवसांपासुन नगर-मनमाड हा महामार्ग खड्ड्यामुळे जीवघेण्या ठरला असून रस्त्याची वाताहत झाल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्युचा सापळा बनला आहे.तेंव्हा जागतिक बँकेने कोपरगाव हद्दीतीलनगर-मनमाड महामार्ग तातडीने दुरूस्त करावा अशी मागणी भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की,कडेला घळ्या पडलेले आहेत तसेच दुभाजकास पट्टे मारलेले नाही, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या इलेक्ट्रिक केटाय बसवलेले नाही, या रस्त्यावर जागतिक कीर्तीचे श्री साईबाबा मंदिर, जंगली महाराज आश्रम, महानुभाव पंथ श्रीकृष्ण मंदिर, जनार्दन स्वामी समाधी मंदिर, जगदंबा माता मंदिर, कोपरगाव बेट गुरु शुक्राचार्य धार्मिक स्थळे आहेत, तेव्हा या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून या रस्त्याचे मजबुतीकरण दुभाजक झेब्रा क्रॉसिंग संदर्भात तात्काळ तात्काळ दुरुस्ती व्हावी.
चौकट
कोपरगाव येवला नाका ते सावळीविहीर पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी रूपये निधी मंजूर केला होता. त्या निधीच्या माध्यमातून २८ ऑक्टोबर २०२० या मार्गावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र अवघ्या चार सहा महिन्यात या रस्त्याची दुरावस्था होऊन थोडेथिडके नव्हे ४० कोटी अक्षरशः पाण्यात गेले.याची चौकशी झाली पाहिजे.