कोपरगावात शेती शिक्षक घडविण्यासाठी शिक्षक दिनी ऊस शेतीशाळा-अशोक आढाव
Sugarcane Farmer’s School-Ashok Adhav for Teacher Training in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon6sep 2021, 10:50Am.
कोपरगाव : तालुक्यातील शेतकरी आधुनिकतेची कास धरणारे असून सोयाबीन उत्पादन वाढ, विस्तार, विविध बिजप्रक्रिया, १८ इंची पेरणी, एकात्मिक खत व किड नियंत्रण इत्यादींमध्ये निपुण असून पीक उत्पादकता वाढीसाठी प्रयोगशील शेतकरी येथे घडत असताना शेती शाळेतून आज शेती शिक्षक घडविण्याचा प्रयत्न आहे. एक पिढी घडवितो तर दुसरा जगाचे पोट भरवितो असे गौरवोद्गार तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शिक्षक दिनी आयोजित अनोख्या धारणगाव मुर्शतपुर येथील ऊस शेती शाळेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी कृषी अधिकारी अशोक आढाव यांची बदली झाल्याने त्यांच्याप्रती रूणनिर्देश व्यक्त करताना उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. अशोक आढाव पुढे म्हणाले की, शेतीत प्रयोग करत राहणं आणि त्यातून उत्पादन वाढ शिकणं हा मौलिक संस्कार कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जपला आहे. शिक्षक दिन हा गुरुजनांच्या प्रति आदर करणारा दिन असून शेतीतील शिक्षक वाढविण्यासाठी येथील युवा शेतकऱ्यांनी सातत्याने पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रारंभी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऊसतज्ञ डॉ. ज्ञानदेवराव हापसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुर्शतपुर सरपंच साधना दवंगे व धारणगावचे सरपंच नानासाहेब चौधरी यांनी प्रास्ताविकात केले. देवेंद्र रासकर तालुका कृषी सहाय्यक संगीता सोळसे सहाय्यक प्राध्यापक व कृषीतज्ञ पोपटराव खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी सहायक तुषार वसईकर, प्रशांत बागल, कृषी पर्यवेक्षक राजेश तुंभारे, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, मनोज सोनवणे, शेतकरी सर्वश्री राधा बापू शिंदे, जालिंदर शिंदे, बापूसाहेब शिंदे, सचिन शिंदे, सुनील दवंगे, संजय उगले, माणिक शिंदे, महेश तिपायले, उपस्थित होते. शेवटी तालुका कृषी सहाय्यक संगीता सोळसे यांनी आभार मानले. चौकट शेतीत संशोधन, ज्ञान आणि शेती विस्तार या तीन पानांना विशेष महत्त्व आहे, ते कृषी विद्यापीठाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवण्याचे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे कृषीतज्ञ व सहाय्यक प्राध्यापक पोपटराव खंडागळे यांनी सांगितले.





