आत्मा मालिक येथे ओपन राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धा संपन्न
Open state level Silambam competition held at Atma Malik
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 14:00Pm.
कोपरगाव :महाराष्ट्र ओपन राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धा ओम गुरुदेव ध्यानपीठ, कोपरगाव येथे ३ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान संपन्न झाल्या.
या स्पर्धेत राज्यातील नगर, रायगड, श्रीगोंदा, पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यातील सुमारे २५० खेलाडूंनी सहभाग घेतला होता.अशी माहिती जिल्हा सिलंबम असोसिएशन अध्यक्ष प्रेसिडेन्ट डॉ. झिया शेख यांनी दिली.
५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेच्या पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत ४२ सुवर्ण, ४ रजत, व ३ कांस्य पदके मिळवून नगर जिल्हा प्रथम स्थानावर राहिला या संघात कोपरगावचे २८ विद्यार्थी होते.
महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन अध्यक्ष
पाशा आत्तार यांनी सिलंबम ह्या खेळाचा प्रचार व प्रसार राज्यातच नाही तर संपूर्ण देशात वाढवला आहे.
या कार्यक्रमासाठी ओम गुरुदेव आत्मा मालिक प्राचार्य मयूर ढोकचौळे, मॅनेजर साईनाथ वरपे,महावीर प्रसाद शर्मा क्रीडा विभाग यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
महावीर प्रसाद शर्मा क्रीडा विभाग माजी नगर सेविका सौ. ताराबाई वाजे व गोविंदराव वाजे देखील हजर होते.
आयोजक राज्यस्तरीय स्पर्धा अध्यक्ष संतोष खैरनार, हेमंत कोकाटे, नाझीम शेख परिश्रम घेतले.
स्पर्धा यशस्वी करण्याकामी जिल्हा सिलंबम असोसिएशन अध्यक्ष प्रेसिडेन्ट डॉ. झिया शेख, सचिव डॉ. सौ. अमरप्रीत शेख, प्रशिक्षक आयेशा पठाण, साहिल गवारे व राहील शेख यांचे मोलाचे योगदान राहिले, शेवटी आभार डॉ. झिया शेख यांनी मानले.