राहिलेल्या सव्वा लाख लोकांनी लसीकरण करून घ्यावे –आ. आशुतोष काळे

राहिलेल्या सव्वा लाख लोकांनी लसीकरण करून घ्यावे –आ. आशुतोष काळे

The remaining one and a half lakh people should be vaccinated. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu9sep 2021, 18:00Pm.

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात आजपर्यंत १८ वर्ष वयाच्या पुढील ८० हजार ४६ नागरिकांचे लसीकरण झाले असून राहिलेल्या १ लाख २० हजार नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे .

आ आशुतोष काळे म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आजमितीला लसीकरण हाच एकमेव पर्याय संपूर्ण विश्वापुढे आहे. लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात आपण सर्वांनी आपल्या नात्यातील आणेल जवळची माणसे गमविली आहेत.यापुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होणार नसली तरी कोरोना विषाणू बदलत असलेले नवनवीन रूप पाहता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्या १८ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण राहिले आहेत व ज्या ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा मतदार संघातील सर्व नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन तातडीने लसीकरण करून घ्या, कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावागावात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. कोपरगाव तालुक्याला कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरळीत होत आहे. तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोपरगाव तालुक्यात वेळेत केलेल्या उपाय योजनांमुळे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र श्रावण महिन्यापासून सुरु झालेल्या सण उत्सवांमुळे बाजार पेठेत गर्दी वाढत आहे. शासनाकडून लॉकडाऊनचे बहुतांश निर्बध शिथिल करण्यात आले असल्यामुळे हि गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरू शकते.अशी भिती आ. काळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page