समताच्या विद्यार्थ्यांना शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

समताच्या विद्यार्थ्यांना शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

Training of Samata students to make Ganesh idols of Shadu

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 16:00Pm.

 कोपरगाव : शैक्षणिक दृष्टीने समताच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण लायन्स चे अध्यक्ष रामदास थोरे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षक अनिकेत जाधव,मयूर जाधव आणि साक्षी सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात बनविलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती  उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त घरी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी विद्यार्थी घेऊन गेले.

  सदर प्रशिक्षण शिबीराचे समता स्कूलच्या फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते.याबद्दल पालकांनी व्यवस्थापन मंडळ, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आदींचे मनापासून आभार मानले.   यावेळी स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी  सौ स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे ,शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page