गणराया कोरोना जाऊ दे, जनतेला सुखी होऊ दे – विवेक कोल्हे
Let Ganaraya Korona go, let the people be happy – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 16:20Pm.
कोपरगाव : विघ्नहर्त्या कोरोनाच संकट दूर होऊन तालुक्यातील जनतेला पुन्हा सुख समृद्धीसह आरोग्यमय जीवन लाभू दे अशी प्रार्थना जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली.
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी ९३ वर्षात पदार्पण केल्याचे औचित्य साधत भीमा संवत्सरकर, विजय जाधव, सरपंच सुनिता संवत्सरकर,यांनी विवेक कोल्हे यांच्या हस्ते ९३ मूर्तीचे मोफत वाटप केले
याप्रसंगी सुनील शिंदे, श्रीपाद गंडे, रोहित वाघ, माणिक संवत्सरकर आदी उपस्थित होते. आलेल्या देणगीतून कोकमठाण येथील गोशाळाला हिरवा चारा देण्याचे भीमा संवत्सरकर यांनी सांगितले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, पूर्वी करमणुकीची साधने कमी होती. त्याकाळी संजीवनीसांस्कृतिक मंडळ गणपती दहा दिवस उत्सव काळात विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करीत, आता करमणुकीसाठी अनेक पर्याय आलेले आहेत. कोरोनाचा तिसरा लाटेचा धोका आहे, तेव्हा गणेशभक्तांनी स्वतःसह परिसर व गावाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहून गणरायाचा उत्सव पार पाडावा., युवकांनी दहा दिवस काळजी घेत सामाजिक कार्य करून पर्यावरण संतुलनासाठी घरच्या घरी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेवटी सुनील शिंदे यांनी आभार मानले.





