मनसेने तरूणांच्या शक्तीचा वापर करून निवडणुका लढवाव्यात -वसंत तात्या मोरे
MNS should fight elections using the power of youth – Vasant Tatya More
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 16:40Pm.
कोपरगाव : कोपरगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठ्या प्रमाणात संघटन करुन तरूणांची फौज निर्माण केली या शक्तीचा निवडणुकीत योग्य वापर करुन येणाऱ्या निवडणुका मनसेने लढवाव्यात असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराध्यक्ष वसंत तात्या मोरे यांनी वीरा पॅलेस कोपरगाव येथील मनसे मेळाव्यात केले.
मोरे पुढे म्हणाले, शहराध्यक्ष सतिष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांची मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे मनसेला कोपरगावात चांगले दिवस येणार आहे. त्याच बरोबर शिर्डीचे मंदिर खुले करण्याची मागणीही यावेळी केली आहे. बालाजी मंदिर खुले आहे मग शिर्डी मंदिर बंद का असा सवाल त्यांनी केला आहे. यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत तात्या मोरे व पुणे नगरसेविका रूपाली पाटील यांच्या उपस्थीतीत धारणगाव, देवीवस्ती येथील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला रूपाली पाटील म्हणाल्या, कोपरगावात मनसेने महिलांना पक्षात स्थान देवून खरोखर न्याय दिला असुन राजसाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करुन कार्य करत आहे. आम्ही जिजाऊंच्या लेकी आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. अन्याय अत्याचार विरोधात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढतांना राज ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करत आहोत. महिलांना अनेक ठिकाणी डावलण्यात येते परंतु सतिष काकडे यांनी राज ठाकरे यांचे विचार आचरणात आणून महिलांना काम करण्याची संधी दिली आहे. येणारी निवडणुक लढविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मेळाव्यासशहराध्यक्ष,सतिश आण्णा काकडे मनसे शहराध्यक्ष,रघुनाथ मोहिते उपतालुकाध्यक्ष, अनिल गाडे. उपशहराध्यक्ष,विजय सुपेकर उपशहराध्यक्ष,बापु काकडे संस्थापक हिंदु सम्राट संघटना कोपरगाव,आनंद परदेशी विद्यार्थी शहराध्यक्ष,रोहित एरंडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष,संजय जाधव विद्यार्थी उपशहराध्यक्ष,नितिन त्रिभुवन कामगार जिल्हाध्यक्ष,बंटी सपकाळ विद्यार्थी जिल्हा संघटक,जावेद भाई शेख वाहतूक तालुकाध्यक्ष,सचिन खैरे वाहतूक शहराध्यक्ष, नवनाथ मोहिते मनसे युवा नेते ,मुकुंद काकडे, राजुजाधव, माणिक मोहिते, बल्ली पाटोळे, छोटुभाई पठाण ,सागर महापुरे, जयेश जाधव , अनिकेत खैरे , महेश वारकर , सुनिल माळवदे,राज परदेशी, युवराज पवार,सुनिल मोहिते , अनिल सुपेकर, अंजिक्य काकडे , भारत गाडे , आकाश काकडे, पप्पु सोनवणे,आदि मनसैनिक उपस्थित होते