ते पाच कोटी तर पालीकेच्या हक्काचा निधी, जनतेची दिशाभूल करू नये; अरिफ कुरेशी
If it is five crores, then the fund for the rights of the municipality should not mislead the people; Arif Qureshi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 16:50Pm.
कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी आणलेल्या पाच कोटींच्या निधीतून रस्त्याची कामे तातडीने व्हावीत अशी मागणी काळे गटाच्या नगरसेवकांनी पालिकेकडे केली होती.यावर ते पाच कोटी तर पालीकेच्या हक्काचा निधी असून , काळे गटाच्या नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करू नये असे प्रत्युत्तर उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी दिलं आहे.
नगरपालिका ताब्यात असो नसो अगर आमदार सत्ताधारी किंवा विरोधी असले तरी शहराच्या विकासासाठी सरकार राज्यातील प्रत्येक नगरपालिकांना विविध योजनांतर्गत निधी वितरित करीत असते, त्याच धर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण निधीतून पाच कोटीचा निधी आलेला आहे. या निधीशी आ.आशुतोष काळे यांचा सुतराम संबंध नाही, तेंव्हा पालिकेच्या त्या पाच कोटी हक्काच्या निधीवरून काळे गटाच्या नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करू नये असा घणाघात आरिफ कुरेशी यांनी केला आहे.यापुर्वी काळे व त्यांच्या नगरसेवकांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता,अशी टिका त्यांनी केली. याउलट माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे कार्यकाळात कोपरगाव नगरपालिका इमारत, पाणीपुरवठा योजना, नाट्यगृह, बस स्थानक, पोलीस स्टेशन, बाजारओटे, अग्निशमन इमारत, इत्यादी प्रकारच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ही कामे मार्गी लावलेले आहेत असे कुरेशी शेवटी म्हणाले.





