जायकवाडी धरण ५५.७४ टक्के भरले ; गोदावरीतून साडेतेरा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
Jayakwadi dam 55.74 percent full; Discharge of 13,427 cusecs of water from Godavari
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun12sep 2021, 18:40Pm.
कोपरगाव : गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाची पाणी पातळी सकाळी दहा वाजता १५१२.८१ फूट होती एकूण पाणीसाठा १९४८.२५२ दशलक्ष घनमीटर (एकूण ६९ टीएमसी) होता. तर उपयुक्त जिवंत पाणीसाठा १२१०.१४६ दशलक्ष घनमीटर (४३ टीएमसी) होता. गोदावरी नदीतुन जायकवाडी धरणात १३,४२७ क्युसेक पाण्याची आवक सुरु असून जायकवाडी धरण ५५.७४ टक्के भरले आहे अशी माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली.
नाशिक जिल्ह्याच्या धरण परिक्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे त्यामुळे गंगापूर धरण ९५ टक्के दारणा धरण ९७ टक्के भरले असून ते कोणत्याही क्षणी १००% होण्याची शक्यता आहे. श्रीगणेशच्या आगमनासोबतच पावसाचे देखील पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कोपरगाव तालुक्यात ही सर्वदूर पाऊस कोसळत आहे. अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी झडताहेत, ढगाळ वातावरण असल्याने व शहरात पावसाला जोर नसल्याने सर्वत्र चिडचिड निर्माण झाली असून तेंव्हा अनेक जण वाहनांसह घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
डास, पिसवा, मच्छर यांचे प्रमाण वाढले असून अनेक जण साथीच्या आजाराने आजारी पडले आहेत. नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण आता ९५ टक्के तर दारणा ९७ टक्के भरले आहे. नाशिकच्या धरण क्षेत्रात ९० टक्के साठा झालेला आहे. त्यामुळे आता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दारणातून १००६०, नांदूरमध्यमेश्वरमधून १६५८२ क्युसेस कडवा मधून १६९६ आळंदी मधून ३० वालदेवी मधून १८३ पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दुपारी १२ वाजेपासून गंगापूर धरणातून ५०० क्युसेस पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुराच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.आज रविवारी (१२) सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासातील दारणा गंगापूर धरण समूहातील पाऊस पुढील प्रमाणे इगतपुरी ९८,घोटी ६०,भावली ११०, दारणा ४१,त्रंबकेश्वर ५४, आंबोली ५९, गंगापूर ५०,मुकणे ३२, पालखेड ८, व नाशिक ३२ मिलिमीटर पडला असून रविवारी दुपारी १२ पासून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी च्या दिशेने १३,४२७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाजता सुरू होता. अशी माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे.