समताच्या विद्यार्थ्यांनी स्वतःतील नेतृत्व गुण विकसित करावे – डॉ. ओंकार जोशी
Samata students should develop their own leadership qualities – Dr. Omkar Joshi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun12sep 2021, 17:40Pm.
कोपरगाव : भारतीय लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाला हक्क असतो. त्याप्रमाणेच एक नियंत्रित व्यवस्था तयार होत असते. त्यातून देशाचा, राज्याचा कारभार चालविणे सुकर होते. बालवयातच मिमिळालेल्या या संधीचा समताच्या विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वतःतील नेतृत्व गुण विकसित करावे असे मत शिर्डी येथील प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी व्यक्त केले.
समता इंटरनॅशनल स्कूल मध्येही २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थी अथर्व बेरगळ आणि दिवा सांड या दोघांची मुख्य प्रतिनिधी सहाय्यक मुख्य प्रतिनिधी अंश शिंदे, इशिका वर्मा, शैक्षणिक प्रतिनिधी गणेश गवळी, सहाय्यक प्रतिनिधी सिद्धांत मिलानी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी संजना विभूते, सहाय्यक कार्यक्रम प्रतिनिधी अनय देशमुख, शिस्त प्रतिनिधी म्हणुन तनुष्का राजेभोसले, सहाय्यक शिस्त प्रतिनिधी नक्षत्रा जपे, स्वच्छता प्रतिनिधी भावेश बोथरा, सहाय्यक स्वच्छता प्रतिनिधी कृष्णा गुप्ता, क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार, सहाय्यक क्रीडा प्रतिनिधी अजिंक्य वाथोरे आदींची निवड विविध पदांवर लोकशाही पद्धतीने झाली. डॉ.ओंकार जोशी व समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदांचा पदभार देण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्कूलच्या शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी करून दिला तर शिक्षिका सौ.शोभा चव्हाण यांनी सर्व प्रतिनिधींकडून पदग्रहणाची शपथ वदवून घेतली. माध्यमिक विभागप्रमुख सौ.शिल्पा वर्मा यांनी प्रास्ताविक केले.
सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या कि,‘एखाद्या पदावर निवड झाल्यानंतर त्या पदाची जबाबदारी स्वतःहून पुढाकार घेऊन पार पाडावी लागते. त्यामुळे निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कार्यक्षमतेनुसार मिळालेल्या पदावरून काम करताना समता स्कूलचे नियम, शिस्त यांना विशेष प्राधान्य देऊन खेळीमेळीच्या वातावरणात दिलेली जबाबदारी पार पाडावी.
चि.सिद्धांत जोशी व राजहंस आढाव यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती खालिया व संस्कृती कदम यांनी केले.
यावेळी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, व्यवस्थापन मंडळ, शैक्षणिक संचालिका सौ. लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर अत्तार यांनी पदग्रहण स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभार शिक्षक संग्राम ताम्हाणे यांनी मानले.





