आदेश भंगप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकासह १३८ जणांवर गुन्हा दाखल,
138 people, including two NCP corporators, have been booked for violating the order.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon13sep 2021, 18:50Pm.
कोपरगाव : सुदेश थिएटरजवळ वास्तव चौकात शनिवारी (११) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोवीड इन्सीडंट कमांडर (तहसिलदार) यांची परवानगी न घेता शासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता अचानकपणे निषेध आंदोलन केल्याने आदेश भंगा प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकासह १३८ जणांवर कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक राम खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,सुदेश थिएटरजवळ वास्तव चौकात शनिवारी (११) सकाळी ११.२० वाजेच्या सुमारास आरोपी मजकुर हे कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे, शिवसेना पक्षाचे, व म.न.से. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनास कुठलीही पुर्व सुचना न देता कुठल्याही प्रकारचे सामाजीक अंतर न पाळता त्यातील बरेच कार्यकर्ते विनामास्क रस्ता अडवुन रस्त्यावर मुरुम टाकुन तो पसरविताना व गर्दी करुन न्युज चॅनलला बातमी देताना व हातात कोल्हे गटाचा निषेधाचे बोर्ड घेवुन वावरताना दिसुन आले. तरी वरिल राजकिय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोवीड इन्सीडंट कमांडर (तहसिलदार) यांची परवानगी न घेता शासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता अचानक पणे निषेध अंदोलन केल्याने मा. जिल्हा दंडाधीकारी सो. अ. नगर यांचेकडील आदेश क्र डी.सी. कार्या९ब१/२०६८/२०२१ अहमदनगर दि.१३ /८/२०२१ अन्वयेचा तसेच मा. जिल्हा दंडाधिकारी सो. अ. नगर यांचेकडील आदेश क्र डी.सी./कार्या९ब१/२२२४/२०२१ अहमदनगर दि. १०/९/२०२१ अन्वयेचा भंग करुन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन सामाजीक अंतर न पाळता व विनामास्क एकत्र जमुन शासनाने घालुन दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना सुनिल वसंतराव गंगुले, मंदार सुभाष पहाडे, अनिल शिवाजी गायकवाड, सुनिल जनार्धन फंड, गणेश आबादास लकारे, भरत आसाराम मोरे, तुषार संजय पोटे, नवाज वहाब कुरेशी, कलविंदर हरितसिंग डडीयाल, निखील नंदकुमार डांगे, एकनाथ उर्फ बाल्या कैलास गंगुले, विरेन ज्ञानदेव बोरावके, ऋषीकेश सुनिल खैरनार, राजेंद्र शंकरराव वाकचौरे, संदिप सावळेराम पगारे, संदिप शरद कपिले, विकास श्रिराम शर्मा, चंद्रशेखर सुधाकर म्हस्के, सुनिल आसाराम साळुके, गगन पंडु हाडा, अजित मोहीद्दीन शेख, राहुल विजयकुमार देशपांडे, बाळासाहेब पिराजी साळुंके, फकिर महंम्मद कुरेशी, कार्तीक सरदार, शुभम ठकाजी लसुरे, धनंजय कांतीभाई कहार, अक्षय मिनीनाथ आग्रे, योगेश कांतीलाल गंगवाल, दिनेश मधुकर पवार, राहुल बाळकृष्ण देवळालीकर, संदिप सुरेश देवळालीकर,अशोक गंगाधर आव्हाटे, सुनिल वामन शिलेदार, महेश रविंद्र उदावंत, रावसाहेब चंदु साठे, विजय प्रभाकर त्रिभुवन, इम्तीयाज रफिक पठाण सर्व रा. कोपरगाव व इतर मिळुन आले आहेत. गु.रजि.नं कलम २७९/२०२१ भादवी ३४१,१८८,(२), २६९, २७० महाराष्ट्र पोलीस अधीनियम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा रजी दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. एस. सी. पवार पुढील तपास करीत आहेत.





