गोदावरी नदीतून ३३ हजार क्युसेक्स विसर्ग सुरु- योगेश चंद्रे

गोदावरी नदीतून ३३ हजार क्युसेक्स विसर्ग सुरु- योगेश चंद्रे

33,000 cusecs discharge from Godavari river – Yogesh Chandre

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा Warning to the people along the river

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue14sep 2021, 19:50Pm.

कोपरगाव : तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि आज दि. १४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून ३३४९७ कुसेक पाण्याचा विसर्ग सोडला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रधीकारानातर्फे तालुक्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, प्रशासनाने दिलेल्या सुचानाचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. नदी,ओढे व नाल्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे.तसेच पाणी पातळीत वाढ होता असताना नागरिकांनी नदी, ओढे, नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलंतरीत व्हावे. नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये.पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.धरण व नादिक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी चढू नये,धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्यूतवाहिनी जवळ थांबू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसिल कार्यालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२४२३- २२२७५३ यावर संपर्क करावा .

Leave a Reply

You cannot copy content of this page