संजीवनी अकॅडमीला ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ तर सौ.मनाली कोल्हेंना  ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि ईअर’ पुरस्कार

संजीवनी अकॅडमीला ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ तर सौ.मनाली कोल्हेंना  ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि ईअर’ पुरस्कार

Sanjeevani Academy gets ‘Educational Excellence’ award and Mrs. Manali Kolhen gets ‘Educational Reformer of the Year’ award

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed 15sep 2021, 19:30Pm.

कोपरगांवः  संजीवनी अकॅडमीला नॅशनल स्कूल अवार्ड या संस्थेने राष्ट्रीय  पातळीवरील ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ हा पुरस्कार तर  स्कूलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांना  ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष  शंकरराव  कोल्हे यांनी २०१२  मध्ये संजीवनी अकॅडमीची स्थापना केली. संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  अकॅडमीने देश  व राज्य पातळीवर अनेक किर्तीमान स्थापित केले. संजीवनी अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच कोरोना महामारीच्या काळात देण्यात आलेले सर्वोत्तम ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे दिलेले शिक्षण यातुन  संजीवनी अकॅडमीला  ‘एज्युकेशनल एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित केले. एज्युकेशनल एक्सलन्स’ या पुरस्कारासाठी देशातील सुमारे ३५०० शाळांनी सहभाग नोंदविला होता. तर सौ. मनाली कोल्हे यांचे ग्रामिण भागात शैक्षणिक  क्षेत्रातील   भरीव कार्याची दखल घेवुन त्यांनाही ‘एज्युकेशनल रिफाॅर्मर ऑफ  दि यिअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनी हे श्रेय  विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दिले आहे.        

संस्थापक अध्यक्ष  शंकरराव व कोल्हे, कार्याध्यक्ष  नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व  विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी या पुस्कारांबद्धल  समाधान व्यक्त करून सर्वांचेच अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page