OBC राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणूका नको – रोहोम
No elections until OBC political reservation is implemented – Rohom
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 15sep 2021, 19:40Pm.
कोपरगाव :ओबीसी आरक्षणचा मुददा प्रलंबित असतांना धुळे, नंदुरबार, अकोले, वाशिम, पालघर व नागपुर या सहा जिल्हयातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यांत याव्यात अशी मागणी कोपरगाव भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली आहे.
रोहोम पुढे म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण हा त्यांचा न्याय हक्क असुन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी हे आरक्षण रहावे म्हणून वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. महा विकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा झाला. मागासवर्ग आयोग नेमुनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ओबीसी आरक्षण प्रलंबित असतांनाही या निवडणुका घेणे म्हणजे ओबीसी समाजबांधवावर अन्याय आहे, हा अन्याय जोपर्यत दुर होत नाही तोपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्यांत यावी असे ते म्हणांले. तत्कालीन आघाडी शासनांने इम्पेरिकल डाटा दिला नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण न्यायालयात टिकले नाही, आताच्या शिवसेना काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीच्या शासन व सत्तेतील मंत्री यांना याबाबतचे गांभीर्य नाही, याबाबत महाआघाडी शासनाचा निषेध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नांवे असलेले निवेदनाची प्रत तहसिलदार योगेश चंद्रे यांना बुधवारी (१५) रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यांत आली याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक राउत, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, जगदिश मोरे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, बापूसाहेब रांधवणे, कोल्हे कारखान्यांचे संचालक प्रदिप नवले, विवेक सोनवणे, संतोष नेरे, चंद्रकांत जाधव आदि उपस्थित होते.