चैताली राऊत सीए परीक्षेत उत्तीर्ण

चैताली राऊत सीए परीक्षेत उत्तीर्ण

Chaitali Raut passes CA exam

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 15:30Pm.

कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापूर येथील चैताली अरूण राऊत ही १३ सप्टेंबर रोजी सीए. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.

सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेली शिंगणापूर गावातील ती पहिलीच कन्या आहे. येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चैताली हिने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे , दहावीला ती ८४ टक्के मार्क मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. पुढे तिने अकरावी-बारावी बी. एम. सी. सी. पुणे येथे केले, सन २०१५ साली ती बी.कॉम.परिक्षा उत्तीर्ण झाली, सीए. परीक्षेसाठी बिर्ला अँड कंपनी मध्ये तिने तीन वर्ष आर्टिकलशिप केली, या काळात पुणे येथील नेहा लाठी व विनोद सतिश लोंगाणी यांचे तसेच आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या अवंती या मोठ्या बहिणीचे तिला मार्गदर्शन लाभले.तसेच अनिल झोडगे व सुनील झोडगे पुणे या दोन्ही बंधुंचे विषेश सहकार्य लाभले.

यशाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका रेणुका विवेक कोल्हे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. तसेच यशवंत अबनावे पत्रकार राजेंद्र सालकर, विजय बनकर, अजित चौरे, दीपक ससाने, शेतकरी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, मंगेश गोंजारे, गौरव माळी, तिचे कौतुक केले. चैताली ही शिंगणापूर येथील शेतकरी अरुण व सौ. वनिता राऊत यांची द्वितीय कन्या आहे.

अरुण व सौ वनिता राऊत यांना अवंती व चैताली या दोन्ही मुली आहेत. चैताली ही सीए. झाली आहे तर अवंती ही आय. ए. एस अधिकारी होण्यासाठी तयारी करीत आहे. आजी सुशिलाबाई ज्ञानदेव राऊत यांची नात तर पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी व दूध उत्पादक रविंद्र राऊत यांची ती पुतणी आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page