संजीवनी पाॅलीटेक्निक क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस पुरस्काराची राज्यातील एकमेव मानकरी – अमित कोल्हे
The only recipient of Sanjeevani Polytechnic Clean and Smart Campus Award in the state – Amit Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 15:40Pm.
कोपरगांव: भारत सरकारच्या आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (ए.आय.सी.टी.ई.), नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘ क्लिन अँड स्मार्ट कॅम्पस ’ या पुरस्कारासाठी संजीवनी पॉलिटेक्निकचा देशात दुसरा क्रमांक आला असून महाराष्ट्रातील साडेतीनशे पॉलीटेक्निक पैकी हा पुरस्कार मिळवणारी संजीवनी पॉलिटेक्निक एकमेव संस्था असून या पुरस्कारामुळे संजीवनीच्या वैभवात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
भारताचे शिक्षण , कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धमेंद्र प्रधान यांचे हस्ते नवी दिल्ली येथिल ए.आय.सी.टी.ई. च्या सभागृहात सभागृहातील शानदार सोहळ्यात प्राचार्य ए. आर. मिरीकर व प्रा. योगेश पवार यांनी स्विकारला. यावेळी व्यासपीठावर केंद्रिय शिक्षण राज्य मंत्री डाॅ. राजकुमार रंजन सिंग,मानव संसाधन व विकास मंत्रालयाचे सचिव श्री अमित खरे, एआयसीटीईचे चेअरमन डाॅ. अनिल सहस्रबुध्दे, व्हाईस चेअरमन डाॅ. एम.पी. पुणिया, मेंबर सेक्रेटरी डाॅ. राजीव कुमार उपस्थित होते. अमित कोल्हे म्हणाले की, एआयसीटीईच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक संस्थेच्या कॅम्पसची वाटचाल स्वच्छ व स्मार्ट भारत घडविण्याच्या दृष्टीने व्हावी या हेतूने एआयसीटीईच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. त्यात प्रामुख्याने ओला कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार करून तेच कॅम्पस मधिल झाडांना देणे व सुका कचरा बाहेर रिसायकलींगसाठी देणे, आधुनिक तंत्रज्ञानाने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षेच्या नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते, कॅम्पस मध्ये बाहेरच्या वातावरणापेक्षा १० टक्के अधिकचे ऑक्सिजन प्रमाण, वाटर हार्वेस्टिंग, आगीच्या संदर्भातील बंदिस्त पाईपलाईनद्वारे घेण्यात आलेली सुरक्षा, वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धण, संस्थेत उभारलेला ५०० किलोवॅटचा सौर उर्जेवरील प्रकल्प व विषारी वायु उत्सर्जन, वेस्ट वाटर चे रिसायकलिंग वापर वृक्षांसाठी वापरणे, पर्यावरण जागृती कार्यशाळांचे आयोजन, इत्यादी बाबींचे प्राचार्य मिरीकर, प्रा. पवार, प्रा. वैभव परजणे यांनी ऑनलाईन पध्दतीने एआयसीटीईला सादरीकरण केले होते. याकामी पथकाला विजय नायडू , डॉ . आर. ए. कापगते, प्रा. विपुल पटेल व प्रा. नागोराव सुरणार यांचेही सहकार्य लाभले. माजी मंत्री व संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी संजीवनी पाॅलीटेक्निकला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करून सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.