समता  इंटरनॅशनल स्कूलच्या गणरायाला उत्साहात निरोप

समता  इंटरनॅशनल स्कूलच्या गणरायाला उत्साहात निरोप

Exciting farewell to Ganaraya of Samata International School

    Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed22sep 2021, 17:00Pm.

कोपरगाव– गणरायाच्या आगमना नंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी विधीवत महापूजा करून समताच्या गणरायाला उत्साहात निरोप दिल्याची माहिती स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.

  प्रसंगी भारतीय संस्कृती व परंपरा जपत ‘मराठी आमची बोली भाषा संस्कृती आमची ढोल ताशा’ या अनुषंगाने आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात समता स्कूलच्या प्राथमिक, माध्यमिक  विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी गणेशोत्सवात सहभागी होत पारंपारिक पोशाख परिधान करून ढोल ताशा ही कला जोपासली. शिक्षक आकाश मिश्रा यांनी गणरायाची महती सांगत शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देत त्यांच्या नावाने गजर केला. तर इतर शिक्षकांनी हातात भगवा ध्वज घेऊन ढोलाच्या तालावर ताशाच्या काडीने, झांजाच्या वेडाने, टोलच्या धडाडीने, अन ध्वजाच्या भरारीने या आधुनिक युगात मराठी संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.            

समता स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय पोषण समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांनी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. तर समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह संदीप  कोयटे,  शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार व व्यवस्थापन समिती सदस्य गणरायाच्या विसर्जन प्रसंगात उत्साहाने सहभागी होत विद्यार्थी, शिक्षकांसोबत आनंद घेतला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page