कोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी –विरेन बोरावके

कोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी –विरेन बोरावके

The development work should be started immediately without wasting time by the kolhe group – Viren Boravake

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed22sep 2021, 16:50Pm.

 कोपरगाव : शहराच्या विकासात भर घालणारे २८ विकासकामे सुरु करण्याचा मार्ग कोल्हे गटाने मोकळा करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी केले आहे.

शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या रस्त्यांसाठी २ कोटी तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी या रस्त्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी आणला आहे. प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष निधी देण्यात आला आहे. लुंबिनी बुद्धविहारकडे जाणारा रस्ता, नगर-मनमाड हायवे ते साई धाम,एस.एस.जी.एम.महाविद्यालयासमोरील रस्ता, आचारी हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल, पंचायत समिती ते आठरे बंगला , श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड नागरे पेट्रोल पंप, मदरसा रस्ता या सर्व २८ कामे चर्चेत वेळ न दवडता सुरू करावीत.

चौकट

विकासकामे थांबू नये ही आमदार आशुतोष काळे यांचे विचार धारणा आहे त्यांनी पालिका कार्यालयासाठी दिलेल्या निधीतून दुसऱ्या मजल्याचे भूमीपूजन करुन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे -विरेन बोरावके

Leave a Reply

You cannot copy content of this page