रांजणगांव देशमुख ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे-स्नेहलता कोल्हे.

रांजणगांव देशमुख ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे-स्नेहलता कोल्हे.

Fill potholes on Ranjangaon Deshmukh to Zagdefata road – Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed22sep 2021, 17:30Pm.

 कोपरगाव:  राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा या रस्त्यावर मोठया प्रमाणांत खडडे पडल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. तेव्हा हे खडडे तातडीने बुजवावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, राज्यमार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. रस्ते वाहतुकीदरम्यान अपघाताचे प्रमाण वाढल्याने रात्री अपरात्री यावरून वाहतुक करणे जिकरीचे झाले आहे. वाहने नादुरुस्त होऊन वाहनधारकांना आर्थीक झळ मोठया प्रमाणांत सोसावी लागत आहे., हे खड्डे बुजविले नाही तर या महामार्गांची आणखी दुरावस्था होईल तेंव्हा हे खडडे तातडीने बुजवावे अन्यथा आपल्याला देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे त्या शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page