कोपरगावच्या साडेचार वर्ष भोग भोगलेल्या जनतेची आसवं पुसण्यासाठी अंतिम टप्प्यात १५ कोटीची कामे करणार 

कोपरगावच्या साडेचार वर्ष भोग भोगलेल्या जनतेची आसवं पुसण्यासाठी अंतिम टप्प्यात १५ कोटीची कामे करणार

To wipe away the tears of the people who have suffered for four and a half years In the last phase, works worth Rs15 crores

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu23sep 2021, 17:30Pm.

कोपरगाव : शहरातील बहुचर्चित आठ कोटी रुपयांची  २८ विकास कामासह छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या रस्त्यांसाठी २ कोटी तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी या रस्त्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटीची कामे यात डांबरीकरण करणे पालिका कार्यालयात संरक्षण भिंत न करणे बगीच्या करणे अमरधाम विकसित करणे, पालिका कार्यालय इमारत दुसरा मजला लुंबिनी बुद्धविहारकडे जाणारा रस्ता, नगर-मनमाड हायवे ते साईधाम, एस.एस.जी.एम. महाविद्यालय समोरील  रस्ता, आचारी हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल, पंचायत समिती ते आठरे बंगला , श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड नागरे पेट्रोल पंप, मदरसा रस्ता आदी कामांचा समावेश आहे. ही अंदाजे पंधरा ते सोळा कोटीची कामे कोपरगावच्या साडेचार वर्ष भोग भोगलेल्या जनतेची आसवं पुसण्यासाठी उरलेल्या दोन तीन महिन्याच्या अंतिम टप्प्यात  पालिके मार्फत करण्यात येणार असल्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे .

आठ महिने २८ विकास कामावरून नगराध्यक्ष भाजप – सेना राष्ट्रवादी यांच्यात रणकंदन माजले होते, निवडणुका जवळ येऊ लागल्या तशी आरोप प्रत्यारोपाला धार चढली होती, निवडणुकीच्या तोंडावर काही संधी साधुनी विकास कामाला खोडा घातला याचा नेत्यांसमोर बागुलबुवा केला,   आणि गेल्या आठ दिवसांत रस्त्यांची झालेली दुरावस्था व नागरिकांचे होणारे हाल याचे उमाळे फुटले जनतेच्या आसवांसाठी  “झाले गेले सर्व गंगेला मिळाले” या न्यायाने एका आवाहनवर  अचानक सर्व तलवारी म्यान झाल्या, शब्द पाळा, कामे तातडीने करा, म्हणून काहूर उठले, अचानक सगळे आलबेल झाले, साडेचार वर्षाच्या एका ‘कलगीतुरा’  नाट्यावर पडदा पडला.  गेली साडेचार वर्षे सातत्याने ज्यांनी मुख्याधिकारी  काम करू देत नाही, सत्ताधारी तत्कालीन आमदार  खोडा घालतात, त्यांनी पालिकेचा निधी  सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वळविला, तिळपापड  झाल्याने यावरून आकांड तांडव केले,या निधीसाठी  न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, पितळ उघडे पाडणाऱ्या पत्रकारांवर भाटगिरी केल्याचे लांन्छन  लावले, साडे चार वर्षानंतर जनतेच्या हालअपेष्टांची उपरती झाली जनतेच्या बेगडी प्रेमाच्या नावाखाली तुम्ही तर सपशेल लोटांगण घातले व आता सगळ्यांशी चुम्मा चुम्मी केली मग  आता भाट कोण ? अनेक अधिकारी व  नगरसेवकांचा पाणउतारा करून त्यांचे चरित्र हनन केले, तरीही आपल्या काळात सर्वात जास्त शहर विकासाची कामे झाली असल्याचा डांगोरा कोणत्या आधारावर पिटला जातो हे कळत नाही जर  यांनी सर्वात जास्त कामे केली असतील तर त्यामागे    बहुमतात असलेले भाजप सेनेचे नगरसेवक तात्कालीन आमदार  तत्कालीन   मुख्याधिकारी तात्कालीन  पालिका अधिकारी व पत्रकार या सर्वांचा हात आणि साथ असल्याची कबुली द्यावी लागेल नाहीतर आपल्या काळात कामे झाली नाही हे तरी मान्य करावे लागेल मग तसे झाले तर याचा अर्थ आजपर्यंत नगरसेवक, पत्रकार, अधिकारी, आमदार इतरावर केलेले आरोप सर्व बिनबुडाचे होते .  साडेचार वर्षे सातत्याने आरोप आणि टीका करून केवळ दीड महिने सोशल मीडियावर मौन पाळले म्हणून सर्व संपले, शुद्धीकरण झाले असे होत नाही. मते मागताना जनतेला   दिलेल्या वचनपूर्ती चा हिशोब द्यायचा आहे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाच वर्षाच्या “खाऊंगा ना खाने दुंगा” या पारदर्शी कारभाराचा लेखाजोखा मांडायचा आहे, कोपरगाव येथील सामाजिक  कार्यकर्ते संजय काळे यांना पाच वर्षात भ्रष्टाचार झालाच नाही का? या प्रश्नाचे उत्तरही द्यायचे आहे. सहमतीमुळे सर्व अडथळे दूर झाले आहेत, यापूर्वी काही कामांच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत काही कामे अर्धवट झालेली आहेत. आठ कोटीचा २८ कामांना हिरवा सिग्नल मिळाला आहे नव्याने  पाच कोटींच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत, दोन कोटीच्या नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन झाले आहे, तेंव्हा आता  ही कामे  युद्धपातळीवर सुरू होऊन वेळेआधी संपून जातील यात तिळमात्र शंका नाही मग गेली साडेचार वर्षे ज्या जनतेने यांचा तमाशा पाहिला, रस्ते पाणी स्वच्छता या सर्वच मूलभूत गरजांबाबत मनस्ताप भोगला, त्या जनतेच्या पदरात काय पडले ? आता कोणी कितीही जनतेची कड आल्याचा दावा केला तरी जनता या मागील आर्थिक  नड जाणून आहे. या   पंचवार्षिक ला निरोप देता देता १५ कोटींची ही कामे वेगाने   पूर्ण होतील त्याचा दर्जा त्याची गुणवत्ता  ठरेपर्यंत ही  पंचवार्षिक पूर्ण होईल, “नवा गडी नवे राज्य”  या न्यायाने पुढच्या पंचवार्षिक ला पुन्हा तीच कामे करण्याचा योग पुढचा पंचवार्षिक च्या नवीन सदस्यांना येण्याची तरतूद केली जाईल. बाकी  जय जनता जनार्दन !       

Leave a Reply

You cannot copy content of this page