जीवनात भविष्य सुरक्षित असणे महत्वाचे – विजय कोल्हे
It is important to secure the future in life – Vijay Kolhe
वारीत डाक विभागाचे मार्गदर्शन शिबीर संपन्न Guidance camp of postal department held in Wari
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu23sep 2021, 18:00Pm.
कोपरगाव : आजकाल मनुष्याचे जीवन पूर्णतः धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे मनुष्याचा घडीचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळॆ प्रत्येकाने आपले जीवन विम्याच्या माध्यमातून सुरक्षित केले पाहिजे. कारण, ज्या वेळी एखाद्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेला तर त्या कुटुंबावर आभाळ कोसळते. परंतु, अशा व्यक्तीने जर आपला विमा उतरविलेला असेल तर त्या कुटुंबाला निश्चित आधार मिळतो. आणि नसेल तर कुटुंबीयांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कोरोना काळात तर अनेक कुटुंबावर संकट कोसळले आहे. यासाठी भारतीय डाक विभागात अनेक अशा सरकारी विमा योजना आहेत. त्यांची माहिती घेऊन या योजनांचा लाभ घेत ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले जीवन व भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन श्रीरामपूर डाक विभागाचे विकास अधिकारी विजय कोल्हे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिगवंत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या स्मरणार्थ राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय डाक विभाग, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (दि.२२ ) सकाळी ९ वाजता भारतीय डाक विभागाच्या विविध योजना, सेवासुविधा याविषयी मार्गदर्शन शिबीर पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी कोपरगावचे डाक निरीक्षक विनायक शिंदे यांनी देखील डाक विभागाच्या बचतीच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन डॉ. सर्जेराव टेके यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, माजी सभापती मच्छिंद्र टेके, सरपंच सतीश कानडे, वारी सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकरराव टेके, कोपरगाव डाक निरीक्षक विनायक शिंदे, विकास अधिकारी विजय कोल्हे, डाक आवेक्षक अर्जुन मोरे, संजय ढेपले, पोष्ट मास्तर विजय ठाकरे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, सेवानिवृत्त अधिकारी एम. के. टेके, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदे, वारी शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव कराळे, कृषी सहायक तुषार वसईकर, ग्रा.प. सदस्या सुवर्णा गजभिव, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, शिंगवे येथील रामभाऊ बाभुळके, नितीन चौधरी यांच्यासह वारी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, आशासेविका उपस्थित होते. यावेळी टेके पाटील ट्रस्टच्यावतीने कर्मवीर जयंतीनिमित्त रामेश्वर विद्यालयातील कर्मवीर अभिवादन कक्षास कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.