प्रसाद सुतार एम. एस. उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना
Prasad Sutar MS leaves for London for higher studies
कोपरगांव : पुणे (पिंपळे निळख) येथील रहिवासी चि. प्रसाद दिलीप सुतार यांची ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटी लंडन येथे एम एस इन रोबोटिक्स उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबददल सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच करण्यात आला.
या प्रसंगी कोल्हे कारखान्यांचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, प्रसाद याचे वडील दिलीप सुतार आदि उपस्थित होते.
बिपीन कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, जास्तीत जास्त प्रगत शिक्षण घेवून त्या क्षेत्रात अत्युच्च नांव कमविण्याची संधी युवकांना तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. २१ व्या शतकातील भारत घडवण्यासाठी युवकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
चि. प्रसाद सुतार याचे वडील दिलीप सुतार हे मायक्रोमॅक्स कंपनीत रिजनल हेड म्हणून काम पहात आहेत. केवळ शिक्षणाच्या जोरावर सर्वसामान्य व्यक्ती साता समुद्रापार उच्च शिक्षणासाठी जाउ शकते हे सुतार कुटूंबियांनी दाखवून दिले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे त्याचे आजोबा गुंडा तातोबा सुतार वास्तव्यास असून ते मुख्याध्यापक होते, श्री गुंडा सुतार यांचे सर्व मुले उच्चशिक्षित आहेत. मणेराजुरी सारख्या खेडयातुन प्रसाद सुतार लंडनला जाणारी पहिलीच व्यक्ती आहे.
प्रसाद सुतार यांचे प्राथमिक शिक्षण भारती विद्यापीठ (पुणे), शालेय शिक्षण न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल (कोल्हापुर), पिंप्री चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे रावेत महाविद्यालय (पुणे) येथे उच्च शिक्षण झाले. बी. ई. मेकॅनिक नंतर त्यांची निवड इन्फोसेस (म्हैसुर), व पुणेमध्ये झाली होती. तदनंतर उच्च शिक्षणासाठी ब्रिस्टॉल युनिव्हरसिटी लंडन येथे निवड झाली त्याबद्दल त्यांचे नातेवाईक, हितचिंतकासह सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.