अंध भावाचा जाण्या-येण्याचा रस्ता अडवला; सर्व कुटुंब उपोषणास बसणार
The blind brother’s way was blocked; The whole family will go on a hunger strike
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu28sep 2021,18:20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायत गावठाण जागेत अंध व्यक्ती बाळासाहेब पोपट लकारे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मोठ्या धोंडीराम लकारे या भावाने त्याच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण करून रस्ता बंद केला आहे तो रस्ता मोकळा करून न्याय द्यावा, या मागणीसाठी १ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर पिडीत अंध व्यक्ति आपल्या सर्व कुटुंबासमवेत उपोषणास बसणार असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालय पाठवले आहे.
श्री. लकारे यांनी पत्रात नमूद केले की, मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. मी माझी पत्नी, दोन मुले, एक मुलगी असे मोलमजुरी करून पोट भरतो माझ्या घराशेजारी माझा मोठा भाऊ धोंडीराम पोपट लकारे हा त्याच्या कुटुंबीयांसह राहतो. त्याचे कुटुंबियातील सदस्यही मला ग्रामपंचायतीच्या रस्त्याने गाणे येण्यास सतत हरकती घेतात. भांडण-तंटे करतात मारहाण करतात, त्याने माझ्या रस्त्यात अडथळे निर्माण केले आहे. याबाबत मी अनेक वेळा पोलिस स्टेशनला तक्रारी केले आहेत. मात्र उपयोग होत नाही. भावाच्या दररोजच्या त्रासाला मी व माझे कुटुंबीय सदस्य कंटाळलो, असून या त्रासापासून मला कायमची मुक्ती मिळावी. यासाठी मी विनंती अर्ज करीत आहे की राज्यशासनाच्या राजस्व अभियानांतर्गत जाण्याचा रस्ता मोकळा करून शिवार रस्ता मोकळा करून द्यावा याकामी ला न्याय मिळावा म्हणून मी १ ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास कुटुंबियासह बसणार आहे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.