कोपरगाव राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी ५ हजार ३०० प्रकरणे निकाली, ३ कोटी ९०लाखाचा वसुल

कोपरगाव राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी ५ हजार ३०० प्रकरणे निकाली, ३ कोटी ९०लाखाचा वसुल

Kopargaon National Lok Adalat disposed of 5,300 cases on Saturday 3 crore 90 lakhs recovered

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun26sep 2021,19:20Pm.

कोपरगाव : न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी शनिवारी २५ सप्टेंबर रोजी कोपरगाव येथे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ५ हजार ३०० प्रकरणे निकाली निघाली असुन ३ कोटी ९० लाखाचा वसूल झाला असल्याची माहिती सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी दिली .

शनिवारी (२५) रोजी सकाळी १० वाजता अत्यंत साध्या पद्धतीने राष्ट्रीय लोक अदालत उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश एम. एस. बोधनकर जिल्हा न्यायाधीश को-हाळे साहेब, दिवाणी न्यायाधीश सचदेव मॅडम, न्या. मिसाळ साहेब, न्या. पांचाळ साहेब, न्या. डोईफोडे साहेब,न्या. शेख साहेब, न्या. सय्यद साहेब, सरकारी वकील अशोक वहाडणे आदी उपस्थित होते. लोक अदालत कामकाजासाठी न्यायाधीश, तहसीलदार, मुख्याधिकारी, ग्रामविकास अधिकारी, वकील वर्ग यांचे आठ पॅनल तयार करण्यात आले होते.

याकामी ॲड. अशोक टुपके, ॲड. वाबळे, ॲड. शंतनु धोर्डे, ॲड. जयंत जोशी, ॲड.भास्करराव गंगावणे, वकील संघ अध्यक्ष लोहकणे, ॲड. सौ देशमुख,ॲड. गायकवाड आदी यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वैवाहिक, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघाताचे दावे, सर्व नागरी बाबी, कामगार आणि औद्योगिक विवाद, दिवाणी, महसुली, सहकारी,पेन्शन बाबी,बँका, पतसंस्था, वीज मंडळ यांच्या वसुली, सर्व स्वीकार्य फौजदारी खटले आणि विवादपूर्व अशी ५३०० प्रकरणे सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाली काढली .

परस्पर संमती आणि दोन्ही पक्षांमधील कराराद्वारे सौहार्दपूर्ण वातावरणात पक्षांच्या संमतीने वाद मिटवले गेले . हे जलद आणि सुलभ न्याय, अपील नाही, दिवाणी न्यायालयाच्या आदेशासारखे अनुपालन, कोर्ट फी परतावा, अंतिम सेटलमेंट, वेळेची बचत असे फायदे मिळतात.

Leave a Reply

You cannot copy content of this page