कोपरगाव चासनळी सरपंचच्या पेट्रोल पंपावर बिबट्याची रात्रीची गस्त

कोपरगाव चासनळी सरपंचच्या पेट्रोल पंपावर बिबट्याची रात्रीची गस्त

Leopard night patrol at Kopargaon Chasanli Sarpanch’s petrol pump

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu28sep 2021,18:50Pm.

कोपरगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी जनावरावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने सोमवारी चासनळी परिसरात पुन्हा एकदा दर्शन दिल्याची माहिती पेट्रोल पंपाचे मॅनेजर प्रवीण पगारे यांनी दिली परिसरातील नागरिकात व शेतकऱ्यात दहशत पसरली आहे .

नुकतीच कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील सरपंच निळकंठ चांदगुडे यांच्या पेट्रोल पंपावर सोमवारी (२७) रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बिबट्याने मोठ्या ऐटीत दिमाखदारपणे चालत १५ ते २० मिनिटं पंपावरील सर्व परिसर गुंडाळून काढला, यावेळी पेट्रोल पंपावर रात्रपाळीसाठी असलेले कर्मचारी विशाल शिंदे होते. त्यांनी समोर बिबट्या पाहताच जीव मुठीत धरून मोठ्या धाडसाने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे व्हिडिओ शूटिंग केलेले तिकडे पंपावर असलेल्या असलेल्या

सीसीटीव्ही कॅमेराने ही बिबट्याचे बिबट्याचा मुक्त संचाराचे चित्रण केले आहे. बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मंगळवारी (२८) रोजी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपास भेट दिली असून, माहिती घेतली आहे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजना बद्दल माहिती सांगितली. खबरदारीचा उपाय म्हणून गुराख्यांनी एकत्र जनावरे संभाळावीत, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, तसेच जनावरे शेळ्या बंदिस्त ठेवण्याचे आवाहन केले आहे.व परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page