नगर – मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवा;अन्यथा टोलनाका बंद पाडू भाजपा इशारा
Fill potholes on Nagar-Manmad highway; otherwise BJP will close Tolnaka
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 29sep 2021,15:00Pm.
कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गावरील टोल नाका ते येवला नाका दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यात रोज किरकोळ छोटा-मोठा अपघात होत आहे. याविषयी टोलधारक नागपुरचे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बघ्याची भूमिका घेत कुठलेच उपाययोजना करण्यात येत नसल्याने संतप्त कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी बुधवारी (२९) रोजी थेट अभियंते शांतीलाल शिंदे यांना जाब विचारला. तसेच ठेकेदार कंपनीला खड्डे बुजवा अन्यथा १५ ऑक्टोबरला तुमचा टोल नाका बंद पाडू, असा इशारा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला . या रस्त्यावर कोणी जर अपघातात मरण पावले तर मनुष्यवधाचा गुन्हा टोलनाका कंपनीवर नोंदवू असा इशारा विश्वासराव महाले यांनी दिला.
यावेळी विश्वासराव महाले, प्रदिप नवले, भास्करराव भिंगारे, वेणुनाथ बोळीज, सुनिल देवकर, सचिन दत्तात्रय कोल्हे, विकास मोरे, संदिप देवकर, डॉ. गोरख मोरे, सुभाष शिंदे, बापू सुराळकर, बाळासाहेब चांदर, बाळासाहेब महाले, पुंडलिक गांगुर्डे, दिनेश कोल्हे, वसंतराव बोळीज, अंबादास लक्ष्मण देवकर, निलेश वराडे, विष्णु बोळीज, सोपानराव शिंदे, निवृत्ती रोहोम, प्रशांत सुराळकर, बाळासाहेब निकोले यांच्यासह येसगांव, टाकळी, खिर्डीगणेश, ओगदी, आंचलगांव, बोलकी, नाटेगांव या पंचकोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, रहिवासी, प्रवासी उपस्थित आहे. कोपरगांव तालुका हददीतील नगर मनमाड महामार्गाची पावसामुळे दुरावस्था झाली, याबाबत भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही अनेकवेळा जागतिक बँक प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी केली आहे. पंचक्रोशीतील रहिवासीयांच्या तीव्र भावना असुन या महामार्गावरील खडडे व्यवस्थित न बुजविल्यास १५ ऑक्टोंबर २०२१ रोजी येवला टोलनाका बंद पाडू यातुन होणा-या नुकसानीची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची राहिल असा इशारा दिला. शेवटी प्रदिप नवले यांनी आभार मानले. ईस्माईल शहा यांनी निवेदन स्विकारले.