कत्तलीसाठी आणलेल्या २२ जनावरांची सुटका; गोकुळधाम गोरक्षा केंद्रात रवानगी
Release of 22 animals brought for slaughter; Departure to Gokuldham Goraksha Kendra
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 29sep 2021,14:00Pm.
कोपरगाव : शहराजवळील संजय नगर भागातील अपना बेकरी जवळ कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. १८ गायी- ४ वासरं अशी २ लाख ५९ हजार रुपये किमतीची २२ जनावरे डांबून ठेवण्यात आली होती. मंगळवारी (२८) रोजी सायंकाळी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. ही जनावरे डांबून ठेवणाऱ्यां दोन जणांविरूध्द शहर पोलिस गुन्हा दाखल झाला .
शहरातील संजय नगर भागात अपना बेकरी जवळ गोवंशीय जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळाली होती. त्यानुसार देसले यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना पाठवून खातरजमा केली. वासुदेव देसले व त्यांचे पथक, अपना बेकरी येथे जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी २२ गोवंशीय जनावरे आढळून आली. गाय, व इतर लहान जनावरांची पोलिसांनी सुटका केली. ही जनावरे मुजाकीर कुरेशी पुर्ण नाव माहीत नाही रा.संजयनगर कोपरगाव, चम्मु हुसेन पुर्ण नाव माहीत नाही रा.अपना बेकरीजवळ कोपरगाव या दोघांनी कत्तलीसाठी आणली होती, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. या प्रकरणी पोका.२६११ राम गोरख खारतोडे (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी (२९) रात्री एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास वरील दोघांविरुद्ध कोपरगाव शहर कॅम्प पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. ताब्यात घेतलेल्या बावीस वंशीय जनावरांची तालुक्यातील कोकमठाण येथील गोकुळधाम गोरक्षा केंद्रात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भर पावसात कोपरगाव शहर पोलिसांनी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई केल्याबद्दल जनतेतून पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.