नव्या उद्योजकांसाठी चौदा हेक्टर जमीन मिळणार -विवेक कोल्हे.
Fourteen hectares of land will be available for new entrepreneurs – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 30sep 2021,10:30Pm.
कोपरगांव : येथील नवउद्योजकांना व्यवसायासाठी दिलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच वाढीव १४ हेक्टर ६९ आर जमीन कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या ताब्यात लवकर मिळेल अशी माहिती मंगळवारी ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन व्यवस्थापक लोखंडे यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. संचालक पंडीत भारुड यांनी प्रास्ताविकात औद्योगिक वसाहतीच्या वर्षभरातील कामांचा लेखाजोखा सादर केला.
याप्रसंगी संचालक सर्वश्री. मुनिष ठोळे, केशव भवर, पराग संधान, डॉ. चंद्रशरेखर आव्हाड, सकृत शिंदे, जितेंद्रसिंग सारदा, रोहित वाघ, सोमनाथ निरगुडे, राजेंद्र शिंदे, वसंतराव देशमुख, भिमा संवत्सरकर, संदिप निकुभ, अरविंद कडलगु, संजय जगदाळे, रविंद्र शिंदे, अभिजित राहतेकर, राजेंद्र रूपनर, कान्हाभाई रावलिया विश्वनाथ भंडारे, मंगेश सरोदे, सुधन चौधरी, ज्ञानेश्वर नाईकवाडे, निलेश वाके आदि सभासद ऑनलाइन, ऑफलाईन उपस्थीत होते.
अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते विश्व इंडस्ट्रीजचे संदिप विश्वनाथ वाणी आदर्श उद्योजक व प्रशांत इंजिनियरिंग वर्क्सचे विश्वनाथ रंगनाथ भंडारे यांना नवउयोजक पुरस्कार प्रदान करण्यांत आले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, कोपरगांव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसाठी येथे कमी पडणाऱ्या सुविधांसाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र ३३ के. व्ही. व वीज पुरवठा प्रश्न मार्गी लागला तर अंतर्गत रस्ते, गटारीचे कामासाठी १ कोटी ९५ लाख ७६ हजार २७६ रुपये खर्चाचे प्रस्ताव दिले असुन पहिल्या टप्प्यात ४२ लाख ७९ हजार ४४५ रुपये मंजुर होऊन त्यातील ७५ निधी औद्योगिक वसाहतीकडे जमा होऊन कामही सुरु करण्यांत आले आहे. तर वसाहतीत नव्याने २५ लाख रुपये खर्चाचा सभामंडप, स्ट्रीट लाईट, संजीवनी क्लस्टर अंतर्गत ३०० महिलांना रोजगाराच्या उपलब्ध होत आहे. सर्व सभासद् व संचालक मंडळाचे सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. शेवटी व्यवस्थापक श्री. लोखंडे यांनी आभार मानले.