संजीवनी बी. फार्मसी देशात रॅन्क बॅण्ड ७६-१०० – अमित कोल्हे
Sanjeevani b. Rank Band 76-100 in Pharmacy Country – Amit Kolhe
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे परीक्षण Examination by the Ministry of Education, Government of India
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 30sep 2021,17:30Pm.
कोपरगांव: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅन्कींग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) अंतर्गत विविध निकषांच्या आधारे व सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाला देश पातळीवर रॅन्क बॅण्ड ७६- १०० मध्ये निवड केली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी ही एकमेव रॅन्कींग बॅण्डच्या कसोटीतील संस्था आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
अमित कोल्हे म्हणाले, देशात १४०० पेक्षा अधिक फार्मसी पदवी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यात ९५० संस्था खाजगी तर उर्वरित ४५० संस्था सरकारी आहेत. या पैकी ३५१ संस्थांनी एनआयआरएफ मध्ये सहभाग नोंदविला होता. यात व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे, समन्वयक प्रा. गिरीश काशीद व डाॅ. रसिका भालके यांनी एनआयआरएफच्या विहित नमुन्यामधिल प्रश्नावली नुसार माहिती व पुरावे अपलोड केले. यात प्रामुख्याने प्रभावी अध्यापन-अध्ययन पध्दती व त्यासाठी आधुनिक मार्गांचा अवलंब, विद्यार्थी व शिक्षकांचे संशोधन कार्य व पेटेंटस्, पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमधील नोकरीचे स्थान अथवा उद्योजग म्हणुन असलेले स्थान, संस्थेची पोहच आणि सर्वसमावेशकता, संस्थेचे निकाल,पी.एच.डी. ही पदवी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचे प्रमाण, विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यादर केलेले शोध निबंध, विविध स्पर्धात्मक परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेले नैपुण्य, अभ्यासक्रम आणि अतिरीक्त अभ्यासक्र उपक्रमांमधिल विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यातुन मिळविलेले यश , संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने बी. फार्मसी व एम. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामधील मिळत असलेल्या नोकऱ्या , या सर्व निकषांचे पुराव्यांसहित समर्पक सादरीकरण करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून प्राचार्य व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.