जलमंत्री पाटील यांनी उजनी योजनेचे तलाव गोदावरी पाण्याने भरून द्यावे – स्नेहलता कोल्हे.
Water Minister Patil should fill Ujani Yojana lake with Godavari water – Snehalta Kolhe.
कोपरगाव : कोपरगाव पश्चिमेच्या भागाला वरदान असलेल्या उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी उजव्या कालव्याच्या ओव्हरफ्लो पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाले की, गोदावरी नदीला व कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी उपसा सिंचन योजनेच्या धोंडेवाडी, वेस, सोयगाव, मनेगाव, अजनापुर हे तलाव भरून मिळावे ही येथील शेतकऱ्यांची मागणी आहे तेव्हा शासनाने तातडीने या मागणीची दखल घेऊन उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्व तलाव गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे असे सौ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी नाशिक पाटबंधारे कार्यकारी अभियंता,पालकमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग तसेच जिल्हाधिकारी नाशिक व अहमदनगर यांच्याकडे दिल्या आहेत.





