कोपरगाव :
तालुक्यातील सुरेगाव मोतीनगर
येथील ४५ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी (२७ जून) प्राप्त झाला.
मागिल बुधवारी (२४जुन) पोटाच्या आजारपणामुळे ते नाशिकला तपासणीसाठी गेले होते. तेथुन ते शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे अॅडमिट झाले. तिथे त्यांचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला. नगर शासकीय रुग्णालयात तपासणीनंतर तिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विघाटे यांनी दिली.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर म्हणाले की, सर्दी पडसे ताप खोकला अशी कोरोना ची लक्षणे कोणाला असतील तर अशा व्यक्तींनी घाबरून जाण्याचे कारण नाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात माहिती दिल्यास उपचार करणे सोयीचे होईल. असेही त्यांनी सांगितले.
शनिवारी (२७जुन) दुपारी त्याचा वैैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. तालुक्यात आढळून आलेला हा पाचवा रुग्ण आहे. दरम्यान, प्रशासनाकडून हा रुग्ण राहत असलेला सुरेगाव मोतीनगर हा परिसर बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे आवाहनही तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.