कोपरगांव हृददीतील रेल्वेचे भूयारी मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी

कोपरगांव हृददीतील रेल्वेचे भूयारी मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी, रेल्वे गेट उघडा

Kopargaon is a Underpass of railway headache for the citizens Open the railway gate

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 6 Oct 2021,17:00Pm.

कोपरगांव हृददीतील रेल्वेचे भूयारी मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी कोपरगाव : मनमाड दौड रेल्वेमार्गावर ज्या ज्या ठिकाणी चौक्या आहेत त्या कॉसिंगवर या उददेशाने रेल्वेने भूयारी मार्ग तयार केले. पण पावसाचे प्रचंड पाणी साचल्याने त्याचा मनस्ताप पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनधारकासह शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे, शेतकरी आदिना होत आहे. हे भूयारी मार्ग म्हणजे डोकेदुखीचे मार्ग बनले आहे.

सर्वसामान्यांच्या हालअपेष्टांना रेल्वेप्रशासनाने अक्षरक्ष: वा-यावर सोडले आहे. या मार्गावर एकुण १८० रेल्वे चौक्या आहेत. त्यावर एका भूयारी बोगद्यासाठी रेल्वे प्रशासनाने २ कोटी रूपये खर्च केला आहे. भूयारी बोगदे केल्याने रेल्वे चौक्या प्रवासासाठी बंद केल्या आहेत. पण यात पावसाचे पाणी प्रचंड साठल्याने भूयारी मार्गही बंद आहेत अशा दुहेरी अडचणींत हे प्रवाशी सापडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडे याचे गा-हाणे मांडले तर त्याची सोडवणुक होत नाही. भूयारी मार्गात साठलेले पाणी इंजिनच्या सहाय्याने काढायचे कुणी, पाणी काढले तर ते सोडायचे कुठे, भूयारीमार्गाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, काहींना आठ ते पंधरा किलोमिटरचा दुरवरचा कोलदांडा पडत आहे, तर आजारी रूग्ण वाचण्याऐवजी यमसदनी जाण्यांची चिन्हे यातुन मोठया प्रमाणांत वाढले आहे. कोपरगांव चौकी गेट नंबर ६९सी चांदर वस्ती जवळील खिर्डी गणेश शिवार गेले १५पंधरा दिवसा पासुन पावसाचे पाणी भरली पाणी उपसा होत नाही ५०० लोकाचे रोजचे येणे जाने अवलंबून आहे शेती माल वाहतूक बंद आहे मोटार सायकल रुळावरुन काढावि लागते, दुध उत्पादक शेतकरी वर्गाचे हाल होत आहे, जीवघेणी वाहतूक यमसदनी पाठवेल अशी अवस्था आहे, वेळोवेळी रेल्वेचे स्थानिक प्रशासन दखल घेऊन उपाय योजना करत नाही तेव्हा बाबासाहेब चांदर, संजय चांदर, बाळासाहेब चिंचपुरे,ढगे, आरुण लभडे रवी आढाव साईनाथ रोहम,आशिष महानुर, गंगाराम नेटके, ज्ञानेश्वर चांदर, सार्थक आढाव ,योगेश चांदर, संजय मोडके,जोपर्यंत पाणी उपसा होत नाही तोपर्यंत रेल्वे गेट उघडुन द्यावे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page