वीज पडली, वीजरोधकयंत्रणेमुळे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिरचा धोका टळला
Power outage, power outage averted the threat of Rashtrasant Janardhan Swami Samadhi Temple
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 6 Oct 2021,17:30Pm.
कोपरगाव: शहरानजीक असलेल्या बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिरालगत अडीचशे-तीनशे फुटाच्या अंतरावर असलेल्या आश्रमाच्या प्रसादालयालगत असलेल्या एका लिंबाच्या झाडावर आज दुपारी तीन वाजता वीज कोसळली मंदिरावर लाइटिंग अरेस्टर वीजरोधकयंत्रना बसवलेली असल्याने सुदैवाने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

याबाबत आश्रमाचे सिक्युरिटी इन्चार्ज प्रमुख शांतीलाल होन व शंकर पवार यांनी दिलेली माहिती अशी आज दुपारी पावसाचा जोरात शिडकावा झाला त्यातच वीजा चमकत होत्या त्यातील एक वीज जोरदारपणे आवाज करीत प्रसादलायालगत एका लिंबावर चाटून गेली नावाच्या एका फांदीच्या ठिकऱ्या उडाल्या येथे प्रसादालयात असलेल्या काम करणाऱ्या भाविक भक्तांमध्ये त्यामुळे मोठी घबराट निर्माण झाली होती. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिराला विजेमुळे कुठलाही धोका अथवा धक्का झाला नाही.





