२००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायदयाचे श्रेय घेणार का ? कोल्हेंचा आमदार काळेंना परखड सवाल

२००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायदयाचे श्रेय घेणार का ? कोल्हेंचा आमदार काळेंना परखड सवाल

Will the Equitable Water Allocation Act of 2005 be credited? Kolhen’s question to MLA Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,17:40Pm.

 कोपरगाव : ७५२ जीचे दीडशे कोटी मी मिळविले असं म्हणत श्रेय घेतलं मग आता २००५ साली समन्यायी पाणीवाटप कायदा होत असताना झोपला होता या पापाचे श्रेय घेणार का ? असा परखड सवाल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांना गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

सावळीविहीर कोपरगांव रस्त्यासाठी दीडशे कोटींच्या निधीचे श्रेय प्रसारमाध्यमांवर अश्लाघ्य भाषेत वक्तव्याचा समाचार घेताना विकासाचे श्रेय हवे तसे पापाचे धनी व्हा,अशा शब्दात विवेक कोल्हे यांनी  आ. काळे यांच्यावर चौफेर टीका केली.

ना. नितीन गडकरी हे तर भाजपाचे कार्यक्षम मंत्री आहेत. नगर इथे भर सभेत मंत्री नितिन गडकरी यांनी व्यासपीठावरून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा थेट उल्लेख करून शिक्कामोर्तब केले असतानाही दोन वर्षात आपण काहीच करू शकलो नाही म्हणून ७५२ जी साठी दीडशे कोटी आणल्याचे आमदाराचे वक्तव्य म्हणजे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका विवेक कोल्हे यांनी केली , मतदार संघातील तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली याचे श्रेय आमदार आशुतोष काळे घेणार आहात का ? अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नाहीत याचे श्रेय आमदार घेणार आहेत का ?रोजगारापासून तरुणांना अलिप्त ठेवण्याचे पाप घेणार का ? असे सवाल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले. आमदार झाल्या पासून कोपरगाव मतदार संघासाठी एक रुपयाचा ही निधी न आणता आज पर्यंत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन करून फोटो सेक्शन करून फोटो सम्राट व खोटे सम्राट अशी नवी ओळख त्यांनी निर्माण केले असल्याचा घणाघाती आरोप विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केला.

निवडणुक जिंकण्यांसाठी त्यांनी कोपरगांव शहरवासियांना पाचव्या साठवण तळयाचे गाजर दाखविले, निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन पाणी पुरवठा योजनेला न्यायालयाच्या माध्यमांतुन खोडा घातला, शहरातील त्या २८ पैकी ६ कामावर जनतेच्या पैशाची नासाडीहोत होती म्हणून विरोध होता, त्याबाबतही काळे विरोधकांनी शहरवासियांच्या मनात आमच्याविषयी नको ते गैरसमज निर्माण केले. आता यातील वाचलेल्या कोटीवधी निधीचा उपयोग शहर हददवाढीत नव्याने समाविष्ठ झालेल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी करावा. शहरातील आंबेडकर पुतळ्यावर त्यांनी आमने सामने येवून एकदाचा काय तो साक्षमोक्ष करावा, असे आवाहन केले. विरोधकांनी उगाचच पाच नंबरच्या साठवण तळयाबाबत जनतेत गैरसमज पसरवु नये असे कोल्हे शेवटी म्हणाले. एकंदरीत काय तर सध्या कोपरगावात ७५२ जीचे दीडशे कोटी ठरले कळीचा मुद्दा रंगला श्रेयाचा कलगीतुरा असेच म्हणावे लागेल,

शहरातील भाजपा पक्ष कार्यालयात श्री. विवेक कोल्हे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत आमदार काळे यांच्या चित्रफित आरोपाचा समाचार घेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, सेनेचे गटनेते योगेश बागुल,  कैलास जाधव, भाजपा गटनेते रवि पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, पराग संधान, जितेंद्र रणशुर, निलेश बो-हाडे, अतुल काले, स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, कालुआप्पा आव्हाड, अशोक लकारे, संदिप देवकर, विनोद राक्षे, गणेश आढाव, बापू पवार, बबलु वाणी, शिवाजी खांडेकर, दिनेश कांबळे, प्रशांत कडु, रविंद्र रोहमारे, विवेक सोनवणे, दिपक जपे, पप्पू पडीयार, रंजन जाधव आदि उपस्थित होते.  शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले

Leave a Reply

You cannot copy content of this page