शेतकऱ्यांना दिलासा; कोपरगावला आता शेतमाल तारण योजना

शेतकऱ्यांना दिलासा; कोपरगावला आता शेतमाल तारण योजना

Relief to farmers; Kopargaon now has agricultural mortgage scheme

प्रशासक एन.जी. ठोंबळ यांची माहिती Administrator N.G. Information of Thombal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,17:20Pm.

कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येथे बारामाही शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. शेतमालास बाजार भावाचा आर्थिक फटका बसू नये यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सूचनेनुसार सोयाबीन या शेतमालासाठी तारण योजना सुरवात करण्यात आली असल्याची माहिती श्री. ठोंबळ यांनी दिली.

सध्या रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी बाजार समिती शेतमाल तारण योजना राबवत आहे. कर्ज वाटप हे सहा टक्के दराने दिले जात असून, तारण कर्ज बाजार भावाच्या ७५ टक्के रक्कमेवर सहा महिन्यासाठी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार पेठेत जास्तीत-जास्त भाव आल्यास विक्री करता येणार आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. सहभागी होताना ही कागदपत्रे आणावी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत येताना बँक पासबुक, आधार कार्ड, चालू वर्षाचा सातबारा, पीकपेरा आणणे आवश्यक आहे. जास्ती जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ व सचिव नानासाहेब रणशुर यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page