शिवसेनेच्या ‘त्या’ भूमिकेला ‘आमचा’ पाठिंबा; त्यांंनीही आम्हाला साथ द्यावी- विवेक कोल्हे
‘Our’ support for Shiv Sena’s ‘that’ role; They should also support us- Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,17:50Pm.
कोपरगाव : समन्यायी पाणी वाटप कायदा २००५ च्या विरोधात कोपरगाव शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेला सर्वपक्षीय म्हणून आमचा कधीही पाठिंबाच असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
शिवसेना समन्यायी पाणी वाटप कायदा २००५ च्या विरोधात नगर नाशिक जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. कोपरगावच्या शहराचा किंवा शेती सिंचनाच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण समोरच्यांनी राजकारण करु नये, असे वक्तव्य विवेक कोल्हे यांनी केले. शिवसेना या कामी पुढाकार घेत आहे व त्यांनी सर्वांना बरोबर येण्याचे आवाहन केले आहे त्यामध्ये काहीही गैर नाही. त्यांनी आम्हाला देखील आवाहन केले आहे. कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कोणासोबतही चर्चेला बसायला तयार आहोत. पण त्यांनी देखील निळवंडे शिर्डी कोपरगाव या बंदिस्त पाईप पाणी योजनेला आम्हाला साथ दिली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले.
निळवंडे चे पाणी कोपरगावला येण्याला आमचाही पाठिंबा! राजेंद्र झावरे
विवेक कोल्हे यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, निळवंडेचे पाणी कोपरगावला आणायचे हे तुम्ही सात आठ वर्षापासून सांगतात मी तर सतरा अठरा वर्षांपूर्वीच नगराध्यक्ष असताना ही संकल्पना मांडली होती. त्यासाठी प्रयत्नही सुरू केले होते त्याचाच एक भाग म्हणून विरोधात असताना ही केवळ शहराच्या पाण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या समक्ष तात्कालीन जलमंत्री अजित पवार यांची संजीवनी येथे आले असता स्टेजवर जाऊन त्यांची भेट घेऊन सही घेतली होती. ती कागदपत्रे अजूनही नगरपालिकेत असतील, शहराचा विकास असो की, पाणी प्रश्न आम्ही राजकीय मतभेदांपलीकडे, विकासाकडे पाहणारे आहोत. विधायक कार्याला आमचा पाठिंबा आहे. कोपरगावला पाण्याची सुगीचे दिवस येणार असतील तर ते पाणी कोणीही कुठूनही आणो, आमचा त्याला पाठिंबाच आहे व राहील! असे सांगितले.