आ. काळेंनी सुचविलेल्या शहर विकासकामांचे प्रस्ताव तयार करा – मंदार पहाडे

आ. काळेंनी सुचविलेल्या शहर विकासकामांचे प्रस्ताव तयार करा – मंदार पहाडे

  Come on. Make proposals for the city development works suggested by Kale – Mandar Pahade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,18:20Pm.

कोपरगाव : शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. शहर विकासाचे सांगितलेले प्रस्ताव शासनाकडे सादर करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.

मंदार पहाडे म्हणाले की, आ. आशुतोष काळे त्यांच्याकडे शहर विकासाच्या अनेक संकल्पना आहेत. यामध्ये कोपरगाव शहरातील बेघर नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी डीपीआर तयार करणे,  गोदावरी नदीकिनाऱ्याचे संवर्धन व सुशोभीकरण करणे, शुक्लेश्वर मंदिर व इतरही मंदिरांचा विकास करणे, शहरातील युवा वर्गासाठी इनडोअर गेम हॉल विकसित करून सोयी सुविधा निर्माण करणे, धारणगाव रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी तातडीने पावले उचलावी, तसेच आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून त्या समाज मंदिरांची कामे सुरु करावीत. तसेच शहरातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा.                

शहरविकासाचे प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे सादर करावे. या प्रस्तावांना मंजुरी मिळविण्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करून शहरविकासासाठी जास्तीत जास्त निधी आणतील व शहर विकासात भर पडेल मंदार पहाडे यांनी म्हटले आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page