गोदावरीच्या २०१९ महापूर बाधित व्यावसायिकांना ९५ लाखाची मदत -आ. आशुतोष काळे

गोदावरीच्या २०१९ महापूर बाधित व्यावसायिकांना ९५ लाखाची मदत -आ. आशुतोष काळे

95 lakh assistance to Godavari’s 2019 flood affected traders -A. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu7 Oct 2021,18:00Pm.

कोपरगाव :  महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे २०१९ ला आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या ३२४ दुकानदार,  टपरीधारक,व हातगाडीधारक व्यावसायिकांना ९५.४० लाखाची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

       ऑक्टोबर २०१९ मध्ये गोदावरी नदीला जवळपास ८० हजार क्युसेसवरून ३ लाख क्युसेसपर्यंत पाणी सोडण्यात आल्याने महापुराचे पाणी कोपरगाव शहरात शिरल्यामुळे अनेक दुकानदार, टपरीधारक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन त्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले होते. प्रशासनाने रीतसर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर केला होता. यापूर्वी खरीप पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  पहिल्या टप्प्यात  ८.२८  कोटी   व दुसऱ्या टप्प्यात  १९ .६७   कोटी अशी एकूण २७.९५  कोटी रुपयांची भरपाई आ काळे यांनी मिळवून दिलेली आहे. आता व्यावसायिकांना शासनाकडून ९५ लाख ४० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केले आहे. हि नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.             

कोपरगाव तालुक्यात प्रथमच महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या व्यावसायिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार असल्यामुळे या व्यावसायिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.  याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, मदत व पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार तसेच  मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page