जागर स्त्री शक्तीचा; साडेतीनशे महिलांनी केले लसीकरण – सौ. पुष्पाताई काळे

जागर स्त्री शक्तीचा; साडेतीनशे महिलांनी केले लसीकरण – सौ. पुष्पाताई काळे

Awake woman power; Three and a half hundred women were vaccinated – Mrs. Pushpatai Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat9 Oct 2021,16:50Pm.

कोपरगाव : १८ वर्षे वयाच्या पुढील तरुणांनी व महिलांनी  लसीकरण घ्यावे असे आवाहन माजी जिल्हा बँक सदस्या सौ चैताली काळे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी महिला मंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे कृष्णाई मंगल कार्यालयात सुरू असलेल्या “जागर स्त्री शक्तीचा” या नवरात्रोत्सव कार्यक्रमात सुमारे साडेतीनशे महिलांनी कोरोना लसीकरण केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.संपूर्ण नऊ दिवस महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले.

सौ. पुष्पाताई काळे म्हणाल्या, कोरोनाचे सावट असले तरी सर्व प्रकारच्या उपाययोजना करून व योग्य खबरदारी घेतल्यामुळे ‘जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सवास महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशाप्रती आपले कर्तव्य समजून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने खास महिलांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली असून महिलांबरोबर पुरुष देखील लसीकरण करून घेत आहे हि अतिशय समाधानाची बाब असून तीन दिवसात जवळपास ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page