पाणी आणि नाट्यगृह हे प्रश्न उंबरठ्यावर आणूनही सुटले नाहीत. माजी आमदारांची खंत
The issues of water and theater have not been resolved. The grief of former MLAs
अपेक्षेप्रमाणे नाही; पण काम समाधानकारक;Not as expected; But the work is satisfactory;
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat9 Oct 2021,17:00Pm.
कोपरगाव : माझ्याकडून शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा होत्या, शंभर टक्के अपेक्षा पूर्ण करू शकले नाही; पण समाधानकारक काम केले. मात्र निळवंडे शिर्डी कोपरगाव पाणीपुरवठा योजना,अदयावत नाट्यगृह हे दोन प्रश्न उंबरठ्यावर आणूनही सुटले नाहीत. याची खंत आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या वाढदिवशी व्यक्त केली.
त्यानिमित्ताने पत्रकारांना माहिती देतांना सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, नगरपालिका कार्यालय नवीन इमारत, नगरपालिका वाचनालय नवीन इमारत, शहर पोलीस स्टेशन नवीन इमारत, नगरपालिका अग्निशामन इमारत, अमरधाम दुरुस्ती, आठवडे बाजार ओटे, कोपरगाव बस स्थानक इमारत, ४२ कोटीच्या पाणी योजनेला सात कोटीची वाढीव निधीची मदत, शहर विकासासाठी सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय झाले पाहिजे यासाठी सर्व ठरावांना बहुमताने मंजुरी दिली. शहरातील रस्त्यासाठी निधी दिला. शहराचा पाणी प्रश्न सुटावा या तळमळीतून प्रामाणिकपणे निळवंडे ते शिर्डी येणारी बंदिस्त पाईपलाईन मोठा पाठपुरावा करून विना खर्चाची पाणी योजना कोपरगाव शहराच्या दारात आणून ठेवली होती, पण ती काही विघ्नसंतोषी लोकांमुळे न्यायालयीन लढाईत अडकली गेली, त्यांनी शहरातील लोकांच्या तोंडचे पाणी पळविण्यांचे पाप केले आहे. तसेच नाट्य रसिकांसाठी नाट्यगृहाची जागा व निधी आणून पालिकेत जमा केला होता. परंतु नकारात्मक भूमिकेमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, निधी परत गेला, ही पालिकेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मला मात्र नाटयमंदिराचे काम करू शकले नाही, याची खंत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शहरातील जनतेमध्ये आजही पाणी, रस्ते, कचऱ्याच्या प्रश्नावरून प्रचंड नाराजी आहे . सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, माझ्या काळात विकासाचा प्रचंड अनुशेष बाकी होता. तो भरून काढण्यासाठी व समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आज शहरासह मतदार संघात बरीच कामे होताना दिसत आहेत,तर काही कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. मतदार संघातील सगळे प्रश्न सुटले, सगळ्या समस्या मार्गी लागल्या, असा माझा दावा नाही. मात्र शेतकरी, सामान्य वर्ग नागरिकांच्या हिताचे अनेक प्रश्न युती सरकारच्या माध्यमातून मी सोडवले आहेत. अपेक्षेप्रमाणे नाही, पण काम समाधानकारक झाले असेही त्या शेवटी म्हणाल्या.





