उक्कडगांवची- श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सव धार्मिक परंपरेने 

उक्कडगांवची- श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सव धार्मिक परंपरेने

Ukkadgaonchi- Navratra celebration at Shri Renuka Mata Mandir with religious tradition

 बकानाच्या पानाफुलांनी देवी सजवण्यात आली. The goddess was adorned with bakana leaves.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun10 Oct 2021,17:00Pm.

कोपरगाव :  तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या व सर्व जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उक्कडगाव च्या रेणुका माता मंदिरात आज साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंग पाळत धार्मिक परंपरेनुसार तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली

देवीला बकानाच्या पानाफुलांनी सजवण्यात आले नीम साडी घालण्यात आली . उक्कडगाव रेणुका माता मंदिराचे अध्यक्ष अशोकराव शिंदे विश्वस्त लक्ष्मणराव शिंदे नंदकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत देवी मंदिरात महा अभिषेक सिंदूर लेपण महाआरती शिरगाव बाजार समितीचे अध्यक्ष रेवणनाथ निकम राणी निकम गिरी आश्रम वैजापूरचे महाराज विश्वस्तांच्या तसेच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यात आले मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .महाराष्ट्रात अनेक देव-देवतांची ठिकाणे आहेत. त्यापैकी श्री रेणुकामाता उक्कडगांव (ता. कोपरगांव) येथील देवी मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्री रेणुकामाता ही सर्व जातीमध्ये कुलस्वामीनी म्हणुन मानली गेली आहे. या देवीचे दुसरे नांव तांदुळजादेवी असेही आहे.                                       अहमदनगर जिल्हयांतील कोपरगांव तालुक्यातील कोपरगांव-वैजापुर मार्गावर 36 किलोमीटर अंतरावर उक्कडगांव वसलेले आहे. हे गांव देवीचे प्रकट क्षेत्र मानले गेले आहे. श्री रेणुका मातेचे मंदिर उत्तराभिमुख असुन अत्यंत सुंदर पध्दतीने श्री क्षेत्र त्रंबकेश्वर महाराज मंदिराच्या धर्तीवर दिव्याचे काम सध्या सुरू आहे. मंदिरात रेणुका मातेची २ फुट उंचीची शेंदुरविलोपीत स्वयंभु मुर्ती आहे. या मंदिरापुढे दोन दीपमाळा आहे. समोरील पटांगणांत पिंपळवृक्ष व वटवृक्षाची दाट छाया आहे. मंदिरात प्रातःकाळी मातेची काकड आरती. देवीस वस्त्र नेसवणे तसेच सायंकाळी सांज आरती केली जाते. गुढीपाडवा, हनुमान जयंती, अश्विन महिन्यांतील नवरात्र ते विजयादशमी या दिवशी भाविक मोठया प्रमाणांवर येथे येवुन उत्सव साजरे करतात. नवरात्रामध्ये असंख्य भक्तगण येथे घटी बसतात. मात्र यावर्षी कोविड परिस्थितीमुळे  प्रशासनाच्या व पोलीस यंत्रणेच्या सूचनेनुसार येथे यात्रा भरवण्यात आलेली नाही .                                         चैत्रशुध्द अष्टमी ते हनुमान जयंतीच्या दिवशी याठिकाणी मोठी यात्रा भरते. उत्सवकाळांत पुजेचे सर्व साहित्य येथे उपलब्ध असते. नवरात्र काळात येथे कुठल्याही प्राण्यांचा बळी दिला जात नाही. येथे असंख्य भाविक नवस बोलतात श्री रेणुकामाता त्याची परीपुर्ती करत असते त्याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. श्री रेणुका मातेचे चरित्र धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील दौंडाईचा यांनी ओवीबध्द करून अकरा अध्याय व प्रत्येकी २२ ते २४ ओबींची रचना केली आहे.                               श्री रेणुकामातेची अख्यायिका अशी की, पंधराव्या शतकात एक शेतकरी आपल्या शेतात सकाळी शेत नांगरू लागला. शेत नांगरतांना त्याच्या नांगराचा फाळ जमिनीत अडकला म्हणुन तो वर काढण्यांचा प्रयत्न करू लागला तो काही निघेना म्हणुन त्याने गावातील काही माणसांना बोलावले व नांगर वर काढण्यांचा प्रयत्न केला तेंव्हा श्री रेणुकामातेने आपले प्रकट रूप दाखविले. ते दाखवत असतांना शेतक-यास दृष्टांत देवुन सांगितले की, तु जर मागे वळुन पाहिलेस तर तुझा नाश होईल आणि त्या शेतक-याला राहवले नाही त्याने मागे वळुन पाहताच श्री रेणुका मातेचे फक्त अर्धेच रूप जमिनीतून वर आले आणि देवीने शाप दिला व त्या शेतक-याचा नाश केला. अशी ही अख्यायिका आहे. या मंदिराचा सुमारे १ कोटी रूपये खर्च करून जिर्णोध्दार करण्यात आला असुन त्याचे काम  पूर्णत्वाकडे जात आहे. भाविक भक्तांनी स्टील सिमेंट वाळू खडी विटा मंदिरास मदत करावी असे आवाहन अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी केले आहे. शहरानजीक असलेल्या जेऊर कुंभारी येथील जुनी गंगा देवी मंदिरात संवत्सर येथील तुळजाभवानी मंदिरात कान्हेगाव येथील जगदंबा माता मंदिरात मायगाव देवी येथील देवी मंदिरात येवला येथील कोटमगाव मंदिरात कोकमठाण येथील लक्ष्मी माता मंदिरात उत्सव साध्या पद्धतीने बसविण्यात येऊन मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई पाना फुलांची सजावट करण्यात आली होती भाविकांनी नतमस्तक होत देवी अंबामातेच रांगेत दर्शन घेतले सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

You cannot copy content of this page