शहर पोलिस व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी
Health check of city police and family
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun10 Oct 2021,17:20Pm.
कोपरगाव : मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे आदेशानुसार डॉ. श्री गावडे व टीम,तेजस्विनी हेल्थकेयर मुबंई, यांच्या वतीने कोपरगाव शहर पोलिसांसाठी संपूर्ण आरोग्य शिबिर शनिवारी घेण्यात आले.

गेल्या दीड वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे बंदोबस्तात दिवस-रात्र एक करणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न पुढे येत आहेत. विशेषतः दिनचर्या बिघडल्याने व तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पुढाकाराने डॉ. श्री गावडे व टीम,तेजस्विनी हेल्थकेयर मुबंई,शनिवारी (९) रोजी हे शिबिर घेतले. डॉ. गावडे यांनी शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, यांच्यासह पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार, होमगार्ड व त्यांचे कुटुंब यांची तपासणी केली. कोरोनामुळे वर्षभर सगळे ठप्प झाले होते. परंतु आता सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्यामुळे हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. आता सण-उत्सव सुरु झाल्यामुळे पाठोपाठ येणाऱ्या सणामुळे पोलिसांवर बराच ताण पडणार आहे त्यांना आता २४ तास ड्यूटी करावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी योग्य निर्णय घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून तातडीने तपासणी शिबिर घेऊन एक प्रकारे पोलिसांना व त्यांच्या कुटुंबाला दिलासाच दिला आहे.





