रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा साबांला आ. काळेंच्या सूचना

रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा साबांला आ. काळेंच्या सूचना

Make road repair proposals. Kale  suggestions Public Works Department

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon11 Oct 2021,17:30Pm.

कोपरगाव :अतिवृष्टीमुळे मतदार संघातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.तर महसूल विभागाकडून खरीप पिकांचे नुकसानीचे पंचनामा होत असून प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

चालू वर्षी देखील परतीच्या अतिवृष्टीचा मतदार संघाला मोठा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे रस्त्यांची, अनेक पूल व छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांचे देखील या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहेत. दोन वर्षापूर्वी कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना २७.९५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिलेली असून कोपरगाव शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व नागरिकांना देखील ९५ लाखाची नुकसान भरपाई मिळवून दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page