मविआच्या महाराष्ट्र बंदला काळया फिती लावून व्यापा-यांचा पाठिंबा

मविआच्या महाराष्ट्र बंदला काळया फिती लावून व्यापा-यांचा पाठिंबा

Traders support Mavia’s Maharashtra Bandh with black ribbons

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon11 Oct 2021,17:50Pm.

 कोपरगाव : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱयांना गाडीखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी एकाकी नाही हा विश्वास देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंदची’ हाक दिली होती. परंतु कोपरगाव येथे दसरा सणा चा आठवडे बाजार असल्याने ट्रेन व्यापाऱ्यांनी बंद न ठेवता लावून या घटनेचा निषेध नोंदविला होता. त्यामुळे आठवडी बाजाराची सर्वत्र रस्त्यावर गर्दी दिसत होती व सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते आहे.

सोमवारी (११)  रोजी सकाळी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निषेधाचे व आरोपींना कठोर शासन करावे असे निवेदन देण्यात आले तहसीलदार यांच्या वतीने हे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी स्वीकारले.

यावेळी बोलतांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, राज्यात आमचे सरकार असतांना देखील आम्हाला बंद पुकारावा लागतो यावरून केंद्रातील भाजप सरकारचा किती अतिरेक सुरु आहे याची कल्पना येते. जे सरकार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारते व जे शेतकरी मागील एक वर्षापासून दिल्ली येथे कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला येत नाही यावरून भाजप सरकार किती अहंकारी झाले आहे हे दिसून येत आहे. पेट्रोल, डीझेलचे दर गगनाला भिडले असून सुरुवातीला व्यापारी पद्धतीने उज्ज्वला गॅस योजना सुरु करून घरगुती गॅस सिलेंडरचे दर १ हजार रुपयाच्या पुढे  गेले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचविण्यासाठी  राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र बंदची करण्यात आली असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे व देशभरातील जनतेच्या रेट्यामुळे या घटनेतील गुन्हेगार मंत्री पुत्राला उशिरा अटक करण्यात आली मात्र केंद्र सरकारने या मंत्र्याचा अद्यापही राजीनामा घेतलेला नाही याचा निषेध करत आहे. यावेळी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, अशी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर विरोधी पक्षाने सरकारवर बोट ठेवून निदर्शन आंदोलन केले असते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एवढी मोठी घटना घडून देखील या घटनेतील गुन्हेगार असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती  पसरून या प्रकरणाला धर्माचा रंग भाजप सरकार देत असल्याचे चुकीचे असून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधातील लढाई असून या लढाईत कोपरगावच्या व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला त्याबद्दल आभार मानले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की, कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेला बंद यशस्वी झाला असून लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेचा व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केलेल्या घटनेचा निषेध करीत असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरेराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेयुवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटेराष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगूलेयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीशिवसेना शहराध्यक्ष कलवींदरसिंग डडियालकाँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदेशहराध्यक्ष सुनील साळुंके,काळे  कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमनगरसेवक गटनेते वीरेन बोरावकेमंदार पहाडे,सुनील शिलेदारराजेंद्र वाकचौरेभरत मोरेप्रफुल्ल शिंगाडेफकीर कुरेशीदिनकर खरेडॉ. तुषार गलांडेजावेद शेख,प्रकाश दुशिंग,राजेंद्र खैरनार, राहुल देवळालीकर,  संदीप कपिलेवाल्मीक लहिरेसुनील तिवारीअस्लम शेखइरफान शेखबाबुराव पवार आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page