मढी बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
NCP workers from Madhi Budruk join BJP
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon11 Oct 2021,18:00Pm.
कोपरगाव : तालुक्यातील मढी बुद्रुक येथील काळे गटाचे माजी उपसरपंच सिताराम आप्पा गवळी व शिवाजी अण्णा निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा सौ. स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला.
मढी बुद्रुक पोलीस पाटील दिलीपराव कारभारी गवळी व अध्यक्ष नानासाहेब कारभारी गवळी आदी या पसंगी उपस्थित होते. प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविक केले. भायुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे मनोगत व्यक्त केले.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तळागाळातील वंचित घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर प्रभावी उपाय योजना केल्या आहेत.
यावेळी भायुमोचे उपाध्यक्ष अमोल दिलीपराव गवळी, रवींद्र डहाळे, भगवान मोकळ, गणपत गुंजाळ, काकासाहेब पवार, बद्रीनाथ गवळी, कैलास गवळी, संपत गवळी, संतोष गवळी, महेश चव्हाण, अनिल गवळी, कृष्णकांत गवळी, मुकुंद गवळी, किशोर खैरनार, संजय गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी नानासाहेब गवळी यांनी आभार मानले.





