वंचितांसाठी सर्वरोग निदान शिबीर उपयुक्त -विवेक कोल्हे.

वंचितांसाठी सर्वरोग निदान शिबीर उपयुक्त -विवेक कोल्हे.

All-round diagnostic camp for the underprivileged – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue12 Oct 2021,17:40Pm.

कोपरगांव:  तालुक्यातील कासली येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानि सर्वरोग निदान शिबीर घेण्यांत आले ते वंचित घटकांना उपयोगी असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.

प्रारंभी कासली सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी प्रास्तविक केले. विवेक कोल्हे व केशव भवर यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.         

  याप्रसंगी दादासाहेब सुबे, शिवाजीराव भगुरे, बाबासाहेब मलिक, बाबासाहेब सुबे, पोलिस पाटील लक्ष्मण मलिक, नवनाथ मरकड, दिगंबर जमधडे, विश्वास जमधडे, दत्तु घेगडमल, समीर मलिक, मल्हारी मलिक, ज्ञानेश्वर मलिक, उषा मलिक, यांच्यासह भाजपा सेलचे विविध पदाधिकारी, विविध संस्थांचे आजी माजी संचालक उपस्थित होते.           

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आरोग्य सुविधा मिळवितांना सर्वसामान्यांची दमछाक होते आहे. त्यासाठी वंचितांच्या दारी आरोग्य उपक्रम नेवुन त्यांच्यापर्यंत थेट लाभ देण्यांबाबतची संकल्पना संजीवनी युवा फाउंडेशनने प्रत्यक्ष कृतीत आणली आहे. आरोग्याच्या ज्या ज्या अडचणी उदभवतील या फाउंडेशनच्या माध्यमांतून त्या सोडविण्यांसाठी आपण आटोकाट प्रयत्न करू त्यासाठी संजीवनी हेल्पलाईनचा आधार उपलब्ध आहे. शेवटी दत्तु मलिक यांनी आभार मानले. कासली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.

Leave a Reply

You cannot copy content of this page