कोपरगाव : वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; कोपरगाव येथील घटना, 

कोपरगाव : वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; कोपरगाव येथील घटना,

Kopargaon: Elderly man commits suicide by strangulation; Incident at Kopargaon,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue12 Oct 2021,18:00Pm.

कोपरगाव :  शहरातील काले मळा, गोरक्षनाथ कॉलनी  येथील एका वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ( ता. १२ ) पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण काशीनाथ नेवगे ( वय ७६ ) असे आत्महत्या केलेल्या वृध्दांचे नाव आहे.

  लक्ष्मण  नेवगे यांना एक मुलगा आहे  नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री लक्ष्मण  नेवगे  हे आपल्या राहत्या घरात झोपले होते. मात्र दुसर्‍या दिवशी मंगळवारी पहाटे , लक्ष्मण नेवगे हे  गॅलरीत  दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले.  दिलीप लक्ष्मण नेवगे (४८) या मुलाने कोपरगाव शहर पोलिसात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक फौजदार एस. सी. पवार  यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह हा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात  पाठवून दिला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात  आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page