साई आधार प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना सेविकांना मोफत देवी दर्शन
Free Devi Darshan to Corona Sevikas on behalf of Sai Aadhar Pratishthan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue12 Oct 2021,17:50Pm.
कोपरगाव :तालुक्यातील चांदेकसारे येथील साई आधार प्रतिष्ठानने कोरोना महामारी च्या काळात ज्या महिलांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली अशा आशा सेविका, अंगणवाडी सेविका,नर्स,डॉक्टर या कोरोना सेविकांना नवरात्रीनिमित्त मोफत देवी दर्शनासाठी बस व्यवस्था केली करण्यात आली आहे.
नवरात्रीनिमित्त देवस्थान देवगड, मोहटादेवी, मढी, शनिशिंगणापूर, कोल्हार भगवती माता या दैवतांचे दर्शनासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना मोफत देवी दर्शनाची बसेस उपलब्ध करून अशी माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक केशवराव होन, अध्यक्ष विजय होन , व्यवस्थापक राजीव होन यांनी दिली. मंगळवारी (१२) रोजी झेंडा दाखवत बस दर्शनासाठी रवाना केली.शेवटी आभार विजय होन यांनी मानले.